Karuna Munde
Karuna Munde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यातील दोन मंत्र्यांच्या पत्नी माझ्या पक्षात यायला इच्छुक

Amit Awari

अहमदनगर - राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या पत्नी करुणा मुंडे ( Karuna Munde ) यांनी शिवशक्ती सेना पक्ष काढणार असल्याची तयारी सुरू केली आहे. या पक्षाची आगामी निवडणुकांतील भूमिका स्पष्ट करण्यासाठी करुणा मुंडे यांनी आज अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी खळबळ जनक दावे केले आहेत. The wives of two ministers from the state want to join my political party

या पत्रकार परिषदेला करुणा मुंडे, शिवशक्ती सेना पक्षाचे सचिव रवी डवळे, प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, कोशाध्यक्ष मुरली धात्रक, प्रवक्ते अजय चेडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी करुणा मुंडे म्हणाल्या, राज्यभर माझे दौरे सुरू आहेत. यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे भ्रष्टाचार व घराणेशाही संपविण्याची मी मोहीम सुरू केली आहे. भयमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. मी घरातून बाहेर पडल्यामुळे अनेक महिलांना हिंमत मिळू लागली आहे. राज्यातील दोन मंत्र्यांच्या पत्नी माझ्या पक्षात येण्यास तयार झाल्या आहेत. मला असे वाटते की हे खूप मोठे महिला सशक्तीकरणाचे काम आहे. कारण कोणत्याही मंत्र्याची पत्नी स्वतःच्या पती विरोधात गेली नाही. असा महाराष्ट्राचा इतिहास आहे. मी जी सुरवात केली आहे. त्यामुळे दोन मंत्र्यांच्या पत्नी माझ्या पक्षात यायला तयार आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की, मला वाटते की मी जी मोहीम सुरू केली. त्यामुळे दोन महिलांचे मी ह्रद्य परिवर्तन झाले. हा माझा मोठा विजय आहे. राज्यात बलात्काराच्या घटना वाढत आहेत. राज्यातील 32 हजार महिला बेपत्ता आहेत, अशा स्थितीत राज्य सरकार काय झोपले आहे का? या दुर्दशा पाहून मी दोन महिलांचे मी ह्रद्य परिवर्तन करू शकले ही मोठी गोष्ट आहे. आमच्या पक्षात कार्यकर्त्यांनी पुढे यावे. संपूर्ण महाराष्ट्रातून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझ्या पक्षाची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. पक्ष नोंदणी झाली नाही तरी मी अपक्ष पॅनल तयार करून आगामी निवडणुका लढणार आहे, असे करुणा मुंडे यांनी सांगितले.

पत्रकारांनी दोन मंत्री कोणते यावर विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, एक मंत्री शिवसेनाचा तर दुसरा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. या दोन मंत्र्यांच्या पत्नी आमच्या पक्षात येण्यास तयार आहेत, असे करुणा मुंडे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT