Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

...तर भाजप नेत्यांची वक्तव्ये कुठे योग्य आहेत

आनंद गायकवाड

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - संगमनेर शहराला सुरक्षित करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( balasaheb Thorat ) यांच्या आमदार विकास निधीतून 39 सीसीटिव्ही कॅमेरे काल ( ता. 19 ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत बसविले. या कार्यक्रम प्रसंगी प्रसारमाध्यमांशी देशातील काँग्रेस आंदोलनांविषयी विचारले असता बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली. ( ... then where are the statements of BJP leaders correct )

बाळासाहेब थोरात म्हणाले, विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारल्यामुळे आंदोलनातील उग्रता वाढली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते थेट भाजप नेत्यांच्या घरापर्यंत आंदोलने करतात, ही वस्तुस्थिती आहे. हे अयोग्य वाटत असले तरी, भाजपच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये तरी कुठे योग्य आहेत.

ते पुढे म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या वडिलांचा उल्लेखकरणे निषेधार्ह आहे. पंतप्रधानपद मोठे पद आहे. या पदावरील व्यक्ती देशाचा नेता व सभागृहाचाही प्रमुख असतो. त्यामुळे त्यांचे लोकसभा व राज्यसभेतील भाषण त्या पदाला शोभणारे हवे. मात्र सध्या भाजपची वैचारिक पातळी खालावल्याचा हा परिणाम असल्याने, त्याच्या प्रतिक्रीया उमटणारच. आम्ही त्यांच्या तुलनेत सौम्य आंदोलने व निषेध करीत आहोत असे थोरात यांनी स्पष्ट केले.

सध्याची राजकारणाची पातळी राज्याच्या हिताची आहे का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, 2014 नंतर देशात झालेले बदल पाहता ईडी सारख्या समाजातील दोष दूर करण्यासाठी निर्माण केलेल्या केंद्रीय यंत्रणांचा वापर राजकारणासाठी होतो हे चुकीचे आहे. कुटूंब, मुले-बाळे, बायका-पोरांपर्यंत ईडीचे पोचणे ही पध्दतच निषेधार्ह आहे. हे चुकीचं वागणे सहनच करायची अपेक्षा त्रास होणाऱ्यांकडून कशी करावी. त्यामुळे तेही याविरोधात बोलणे साहजिक आहे. ही राजकारणाची पध्दत नाही, राजकारण तत्वाचं, विचाराचं व विकासाचं असावं. ज्याने त्याने स्वतःचे काम करावे, तत्वासाठी भांडावे मात्र त्यात व्यक्तिद्वेष नसावा हे राजकारणाचं, लोकशाही व घटनेचं सूत्र आहे. दुर्दैवाने याला वेगळे वळण दिले जात आहे. याला आम्ही कोणी नाही तर भाजप व त्यांची काम करण्याची पध्दत दोषी आहे, असे त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

घटनेने विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपालांनीही अध्यक्षांची निवड करण्याचे पत्र दिले आहे. ही निवड करताना आम्ही काही बदल केले आहेत. लोकसभा व विधानसभेतील स्पिकर, अध्यक्षांची निवड होते त्या पध्दतीने पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री व राष्ट्रपतींऐवजी राज्यपालाचा वापर केला आहे, हे चुकीचे नाही. कारण विधानसभेने याला मान्यता दिली आहे. या पार्श्वभुमीवर ही निवड गुप्त मतदान किंवा खुल्या पध्दतीने होईल. लोकसभा, विधान परिषद व देशातील अनेक सभागृहाने स्वीकारलेली पध्दत असल्याने राज्यपाल त्याला मान्यता देतील अशी खात्री आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतात. आम्ही कळवलेल्या नावातून ती निवड होईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT