MP Amol Kolhe, MLA Rohit Pawar Latest News
MP Amol Kolhe, MLA Rohit Pawar Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amol Kolhe : आत्मक्लेश आंदोलनावरून खासदार कोल्हे अन् रोहित पवारांमध्ये ट्विटरवॅार!

सरकारनामा ब्यूरो

Amol Kolhe News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत. त्याविरोधात छत्रपती संभाजीमहाराजांच्या श्री क्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर, जि. पुणे) येथील समाधीस्थळी शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) मौन धरून आत्मक्लेष आंदोलन केले.

दरम्यान, त्याला पक्षाचे स्थानिक खासदार (शिरूर) आणि शिवराय आणि संभाजीप्रेमी डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हेच गैरहजर राहिल्याने त्याची मोठी चर्चा झाली. कर्जत-जामखेडचे (जि.नगर) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे आठ आमदार, माजी आमदार व इतर पदाधिकारी हजर होते.मात्र,संभाजीमहाराजांच्या भुमिकेतून विशेष प्रकाशझोतात आलेले अभिनेते कोल्हे गैरहजर असल्याने त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. (MP Amol Kolhe, MLA Rohit Pawar Latest News)

दरम्यान, यावर आता अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला या वढू-तुळापूर येथे करण्यात आलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची मला पूर्वकल्पना नसल्यामुळे मी उपस्थित नव्हतो, अशी कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर आमदार रोहित पवारांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं आहे.

कोल्हे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आत्मक्लेश पेक्षा ठसा उमटवण्याला आणि छत्रपतींचे महत्व अधोरेखित करण्याला माझे प्राधान्य! काल वढू-तुळापूर येथे करण्यात आलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची मला पूर्वकल्पना नसल्यामुळे मी उपस्थित नव्हतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचावा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या "शिवपुत्र संभाजी" महानाट्यासंदर्भात माननीय केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय डॅा. भागवतजी कराड यांची भेट घेऊन चर्चा केली.

मतदारसंघातील "आत्मक्लेश" साठी अनुपस्थित असल्याने उगाच चर्चा करण्याची गरज नाही कारण .शिवसिंहाच्या छाव्याने 'आत्मक्लेश' वगैरे बाबींपेक्षा झेपावण्याला आणि ठसा उमटवण्यालाच महत्व दिलं असतं. त्याच आदर्शांवर चालण्याचा माझा प्रयत्न आहे!, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिले आहे.

खासदार कोल्हेंच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगेच ट्विट करत या कार्यक्रमाची माहिती सर्वांना सोशल मीडीयाच्या माध्यमातून दिली असल्याने आणि उपस्थित लोक स्वयंस्फूर्तीने आले होते, असे स्पष्ट करत कोल्हेंना आंदोलनाची कल्पना नव्हती या प्रतिक्रियेस प्रत्युत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT