Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजितदादांचे बेरजेचे राजकारण; नगरमध्ये मोठा नेता गळाला लावत विरोधकांना देणार धक्का

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : आदिवासी युवानेते मारुती मेंगाळ यांचा राष्ट्रवादी प्रवेशाची अकोले तालुक्यात जोरदार चर्चा आहे. आदिवासी समाज्याचे युवानेते तथा माजी सभापती मारुती मेंगाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश होणार असल्याची माहिती खात्रीलाय सूत्रांनी दिली आहे.

मारुती मेंगाळ यांच्या अलीकडेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी दोन ते तीन बैठका या संदर्भात पार पडल्या असुन जवळजवळ हा प्रवेश निश्चित मानला जात आहे. मेंगाळ हे ठाकर समाज्याचे युवानेते असुन त्यांनी ठाकर समाज्यात युवा व जेष्ठ वर्गाचे संघटन मोठ्या प्रमाणात केले आहे.

सध्या मेंगाळ हे शिवसेनेमध्ये आहेत. ते अकोले पंचायत समितीचे उपसभापती होते. त्यांनी आपल्या उपसभापती पदाच्या कार्यकालात अकोलेमध्ये मोठ्या प्रमाणात कामे कली. अत्याचारग्रस्त कुटुंब, सामाजिक प्रश्नांसाठी मेंगाळ यांनी आक्रमक आंदोलने केली आहेत. मेंगाळ यांचे सर्वपक्षीय नेते मंडळीशी सुसंवाद आहे. अकोले तालुक्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

अकोले तालुक्यातील जिल्हा व तालुक्यातील बहुजन नेत्याने हा प्रवेश व्हावा म्हणून प्रयत्न केले. पक्षाला ठाकर समाज्यातील मोठ्या युवानेत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मताचे कसे विभाजन होते, हे पवार यांना पटवून दिल्याची माहीत आहे. पवार हे नेहमी बेरजेचे राजकारण करत असतात. अजित पवार यांनी ही अकोले तालुक्यातील भविष्यातील राजकारणात मत विभाजन टाळण्यासाठी सर्व शक्ती एकञ आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

या प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेरचे आमदार निलेश लंके, जुन्नरचे आमदार अतुल बेणके, आमदार दरोडा हे अनेक दिवसांपासून मेंगाळ यांच्या संपर्कात होते, अशीही माहिती आहे. आमदार डॉ. किरण लहामटे, जेष्ठ नेते अशोकराव भांगरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मेंगाळ यांच्या पक्ष प्रवेशामुळे मोठी ताकद अकोले तालुक्यात मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. भविष्यत विधानसभा, जिल्हा परीषद, पंचायत समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे.

त्यातच अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडत ही आदिवासी व्यक्ती राखीव झाल्यामुळे मेंगाळ यांचा पक्ष प्रवेश करुन घेत त्यांना या पदासाठी निश्चित केले जाऊ शकते. व एकीकडे आमदार मोहदयांना त्यांचा मार्ग मोकळा करुन दिला जाऊ शकतो. तर अगस्ती सहकारी साखर कारखाना जेष्ठ नेते अशोकराव भांगरे यांच्या नेतृत्वात चालवला जाऊ शकतो, असा कायास राजकीय जाणकारांकडून वर्तवला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT