Prithviraj chavhan
Prithviraj chavhan  
पश्चिम महाराष्ट्र

Congress : शिवसेनेनंतर आता कॉग्रेसमध्येही पडणार दोन गट ; कार्यकर्ते संभ्रमात

सरकारनामा ब्युरो

-संभाजी थोरात

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी गांधी परिवार आणि काँग्रेस संघटनेबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे सामान्य कॉग्रेस कार्यकर्ता संभ्रमात आहे. चव्हाण यांच्या भूमिकेमुळे आता राज्यातील कॉग्रेसमध्ये दोन गट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेस नेतृत्वहीन पक्ष झाला आहे. काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच केला आहे. गुलाम नबी आझाद यांच्या

माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा घरघर लागली आहे. आझाद यांच्या राजीनाम्याची चर्चा संपते न संपते त्यात आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण दिल्लीतील राजकारणात होते तरीही महाराष्ट्रातील प्रत्येक निर्णयात कॉग्रेस पक्षश्रेष्ठी पृथ्वीराज चव्हाण यांना सहभागी करून घेत होते. राज्यातील कॉग्रेसचा गेल्या 30 ते 35 वर्षाच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

यातूनच पृथ्वीराज चव्हाण यांना थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाठवून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी चव्हाण यांच्या वरील विश्वास दाखवला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीतील कॉग्रेस वर्तुळातून बाहेर पडलेले दिसत आहे. राज्यातील कॉग्रेस नेत्यांचाही त्याना विरोध असल्याचं अनेकदा स्पष्ट झालं आहे.

आता चव्हाण यांनी थेट गांधी घराण्याच्या विरोधात भूमिका घेतल्याने सगळ्यानाच धक्का बसला आहे. चव्हाण यांच्या या भूमिकेला आता कॉग्रेसमधून विरोध होऊ लागला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी चव्हाण यांना थेट जनाधार नसलेला नेता म्हणून डिवचले आहे तर नाना पटोले यांनी चव्हाण यांना भाजपाची फूस असल्या गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता राज्यातील दोन गट पडणार असल्याच स्पष्ट आहे. अगोदरच कॉग्रेसची पीछेहाट होत असल्याने अस्वस्थ असलेला कॉग्रेस कार्यकर्ता या नवीन संघर्षामुळे आणखीच संभ्रमात पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT