Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ते त्यांचे काम करतील आम्ही आमचे काम करत राहू

वसंत सानप

जामखेड ( जि. अहमदनगर ) - केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत पत्र लिहून चौकशी मागणी केली. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. ( They will do their job, we will continue our work )

जामखेड येथे आज विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे, शहाजी राळेभात, महेश राळेभात, अॅड हर्षल डोके, अमोल गिरमे, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे आदी उपस्थित होते.

अण्णा हजारे यांच्या पत्रा संदर्भात रोहित पवार म्हणाले की, मागेही देवेंद्र फडणवीस यांनी असेच पत्र दिले होते. सीआयडी चौकशी झाली होती. यात काहीही निष्पन्न झाले नाही. ते त्यांचे काम करतील आम्ही आमचे काम करत राहू. आम्ही सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासासाठी काम करत आहोत.

ऊस तोडणी बाबत रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेड मधील शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस कारखान्याला नेला जाईल एक टिपरूही शिल्लक राहू देणार नाही. ऊस लागवडीनंतर दहा महिन्यात तोड केली असती तर शेतकऱ्याचा तोटा झाला असता म्हणून टोळ्या पाठवलेल्या नाहीत सर्वांचा ऊस नेला जाईल, असे आश्वासन रोहित पवार यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT