Prithviraj Chavan
Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kasba by election : हा 'महाविकास'च्या एकीचा विजय; आता शिंदे गटाला धूळ चारणार...

सचिन शिंदे

Karad News : भाजपच्या BJP बालेकिल्ल्यातील मतदारसंघात काँग्रेसचा Congress उमेदवार निवडून आला. हा महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi एकीचा विजय आहे. यामुळे आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी भाजप व शिंदे गटाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी दिली आहे.

श्री. चव्हाण म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीचा निर्णय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. 32 वर्षे पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. २०१९ च्या निवडणुकीत मुक्ता टिळक भाजपकडून निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली.

महाविकास आघाडीने एका विचाराने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली व त्यांना महाविकास आघाडी मधील सर्व पक्षांनी मदत केल्यामुळे हा विजय झाला आहे. यामुळे आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी भाजप व शिंदे गटाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांच्या मतांची विभागणी टाळली तर आमचा विजय होऊ शकतो.

चिंचवडला हेच आम्हाला बघायला मिळेल की, विरोधकांच्या मतांची विभागणी करण्यासाठी तिसरा उमेदवार उभा केला गेला. आणि त्यामुळे बरीच मतही तिसऱ्या उमेदवाराने खाल्ल्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आला. पण भाजपविरोधी जनमत मोठे असल्याचे या दोन्ही निवडणुकीच्या निकालातून समजून आले आहे. वंचित आघाडीने त्यांची ताकद नसताना फक्त महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन करून भाजपला फायदा करून देण्याकरिता तिसरा उमेदवार उभा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT