Praniti Shinde
Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde News: ही लोकांची हुकूमशाही, कुणा पंतप्रधानांची नाही; प्रणिती शिंदे भाजपवर कडाडल्या

सरकारनामा ब्युरो

Solapur News : उजनीमध्ये पाणी असूनही सोलापूरला पाणी देत नाहीत. धरणातून सोलापूरला २५ वर्षांपूर्वी पाईपलाईन आणली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी एकही पाईप जोडला नाही. ते केले असते तर आपल्याला आज रोज पाणी मिळाले असते. तेच काँग्रेसच्या काळात दोन दिवसाआड पाणी मिळत होते. भाजपला फक्त सत्ता पाहिजे. त्यांना पाण्याशी, रेशनशी, घासलेटशी, गॅसशी, संजय निराधार योजनेशी यांच्याशी काही देणेघेणे नाही. ही लोकांची हुकूमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची नाही, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केली.

सोलापूरमधील (Solapur) जुना प्रभाग २२ आणि नवीन प्रभाग २३ येथे 'हाथ से हाथ जोडो' अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होत्या. यावेळी त्यांनी सोलापूरच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. तसेच लोकांच्या अधिकाराबाबत जागृती करण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुमच्या संकटकाळात येऊ, नाही आलो तर आमचे कान पकडून घरी बसवा. तो तुम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, असे म्हणत भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर शिंदे यांनी टीका केली.

प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या, "निवडणुका असो नसो काँग्रेसच्या तुमच्या सुखदुःखात सहभागी असणार आहोत. तुम्हाला जेव्हा मदत हवी, त्यावेळी आम्ही धावून येऊ. नाही आलो तर कान धरून खाली बसवा. तो तुमचा अधिकार आहे. आम्ही आमदार, नगरसेवक आमच्या घरी आहोत. ही लोकांची हुकूमशाही आहे. कुणा पंतप्रधानांची हुकूमशाही नाही. आम्ही तुमचे नोकर आहोत. तुमच्या हातात चाबूक आहे. तुमच्या समोर आम्ही मोठे नाहीत, हे कधीच विसरू नका. काम नाही केलं तर आम्हाला ओरडा आणि काम केले तर शाबासकीही द्या."

यावेळी शिंदे यांनी काँग्रेसच्या (Congress) हाथ से हाथ जोडो (Hath Se Hath Jodo) अभियानाबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, "भाजपला पाणी, रेशन, घासलेट, गॅस, संजय निराधार योजना आदी लोकांच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. काँग्रेसमधील नवीन चेहरेही तुमच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) स्वतः चार हजार किलोमीटर चालले आहेत. काही दिवसांनी आम्ही घरोघरी जाऊन तुमच्या समस्या सोडविणार आहोत. कुणाचं रेशन कार्ड, कुणाचं संजय निराधार योजना, अपंग दाखला आदी सर्व समस्या सोडविण्यात येतील. तेच हे 'हाथ से हाथ जोडो' अभियान आहे. कदाचित आम्ही निवडणुकीत येणार नाही, मात्र सुख-दुःखात नकी येऊ."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT