Nana Patole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

हा तर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपचा नवा धंदा

महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) कारवाई झाली.

सरकारनामा ब्युरो

मुंबई - महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) कारवाई झाली. या कारवाई विरोधात महाविकास आघाडीकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी भाजपवर टीका केली आहे. ( This is the new business of BJP to suppress the voice of the opposition )

नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली आहे. आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असे पटोले यांनी सांगितले.

पटोले पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही कारण केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यापूर्वीही विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर अशीच कारवाई केलेली आहे.

भाजपचा हा नवा धंदा आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. केंद्रात सत्ता असल्याचा माज भाजपला असून अशा कारवायांविरोधात आता चर्चा करून आम्ही सामुहिकरित्या लढा देणार आहेत. महाराष्ट्राची बदनामी करुन सत्ता मिळवण्यासाठी हे सर्व चालले असून जनता हे पहात आहे, असे सूचक विधानही पटोले यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT