Pankaja Munde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पंकजा मुंडेंनी समर्थकांना दिला हा संदेश

माजी मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी मोहटादेवी गडावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

सूर्यकांत नेटके

अहमदनगर - माजीमंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र उमेदवारी मिळाली नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते. पाथर्डी (जि. अहमदनगर) येथील एका कार्यकर्त्यांने संतापाच्या भरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांच्या भेटीसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहटादेवीचे दर्शन घेण्यासाठी पंकजा मुंडे आज (मंगळवारी) पाथर्डीला आल्या होत्या. त्यांनी मोहटादेवी गडावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ( This message was given by Pankaja Munde to the supporters )

पंकजा मुंडे म्हणाल्या, "मी कधीही मौन पाळलं नाही. ज्या घटना घडत होत्या, त्या निर्णय प्रक्रियेत नव्हते. त्यामुळे मी त्यावर व्यक्त होणे गरजेचे नव्हते. मी स्तब्ध आहे. आज लोकांनी एवढ्या मोठ्य प्रमाणात स्वागत केले. लोकांचे पाठबळ माझ्यासाठी महत्वाचे आहे. कार्यकर्त्यांच्या भावना मी समजू शकते. मात्र माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे, कार्यकर्त्यांनाही मी विश्वास ठेवायला सांगितले आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

त्या पुढे म्हणाल्या की, "माझं जोरदार स्वागत केलं, हजारो लोक माझ्यापर्यंत पोचले, कौतुक केले. कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. कार्यकर्त्यांना वाईट वाटले, यातना झाल्या, खेद व्यक्त केला. मात्र कुठं तरी संयम ठेवणे गरजेचे आहे. माझा नेत्यांवर विश्वास आहे. कार्यकर्त्यांनाही मी विश्वास ठेवायला सांगितले आहे."

सध्या राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. राजकीय उद्भवलेल्या परिस्थितीवर बोलताना पंकजा पालवे म्हणाल्या, "मी सकाळी साडेसहापासून मी बाहेर आहे. मी त्यांच्या विषयाचा भागही नाही, त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही," असे त्यांनी सांगितले.

जागोजागी जोरदार स्वागत

अहमदनगर आणि शेजारीच जोडून असलेल्या बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे मासलिडर समजल्या जातात. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पाथर्डीला आणि मोहटादेवी येणार असल्याचे त्यांनी आठ दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे आज (मंगळवारी) त्यांनी पाथर्डी, मोहटादेवी गडाचा दौरा केला. भाजप कार्यकर्त्यांनी अहमदनगर-पाथर्डी रोडवर जागोजागी स्वागताचे फलक लावले होते. मोहटादेवीगड, पाथर्डी शहरातही त्यांचे जोरदार स्वागत केले. पाथर्डी व मोहटादेवी गडावर नगरसह बीड जिल्ह्यातील कार्यकर्तेही मोठ्या संख्यने उपस्थित होते. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT