MLA Jaykumar Gore News, Devendra Fadnavis News
MLA Jaykumar Gore News, Devendra Fadnavis News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील; यंदाची आषाढीची पुजाही तेच करतील...

Umesh Bambare-Patil

सातारा : देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा होतील, असा विश्वास व्यक्त करून लवरकच याबाबतची बातमी तुमच्यापर्यंत येईल. तसेच यावर्षीची आषाढीची पुजाही श्री. फडणवीस करतील, असे स्पष्ट मत माण, खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे. (Jaykumar Gore News)

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजपने महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंसह १७ आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार लवकरच महाराष्ट्रात येईल, अशी शक्यता वर्तवली आहे. यासंदर्भात माण, खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. (Latest Political News in Marathi)

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झालंय का नाही, असे विचारले असता आमदार गोरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा होतील. याबाबतची बातमी तुम्हाला लवकरच येईल. यंदाची आषाढीची पुजा ही देवेंद्र फडणवीस करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT