Prithviraj Chavan, Narendra Modi
Prithviraj Chavan, Narendra Modi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

त्या देशांनी पंतप्रधानांना हाकलले; ती स्थिती भारतात येऊ शकते...पृथ्वीराज चव्हाण

विजय खबाले

विंग (ता. कराड) : देशातील अर्थव्यवस्थेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. बेरोजगारी वाढली असून लोकांच्या हाताला काम नाही. तरुण पिढी रस्त्यावर उतरली आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे, त्याला मोदी सरकारच जबाबदार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

विंगमध्ये चार कोटी तीन लाखांच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे सचिव उदयसिंह पाटील, दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, शंकरराव खबाले, मंगल गलांडे, निवासराव थोरात, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. प्रचंड अस्थिरता देशात पसरली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर आपलीही अवस्था शेजारील देशांसारखीच होईल. त्या देशांनी पंतप्रधानांना हाकलले. ती स्थिती भारतात येऊ शकते.

जातीभेदाचे राजकारण मोदी करत आहेत. धर्माचे धुव्रीकरण करत आहेत. धर्माच्या नावांवर राजकारण करून साम, दाम, दंड भेद वापरून भाजपने काँग्रेस फोडली. अशा जातीवादी पक्षाला जागा दाखवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आक्रमकपणे सामोरे गेले पाहिजे.’’

उदयसिंह पाटील- उंडाळकर म्हणाले, ‘‘विलासराव पाटील-उंडाळकरांच्या कॉँग्रेसच्या विचारधारेवर रयत संघटना उभी केली. संस्थांचे जाळे उभे केले. लोकांच्या हाताला काम दिले. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवल्या. संघटनेच्या माध्यमातून या विभागाचे नेतृत्व कॉँग्रेसने केले. यापुढेही ते करेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT