Utkarsha Rupwate
Utkarsha Rupwate Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

चीनला डोळे दाखविण्याची भाषा करणाऱ्यांनी देशाचे झेंडे चीनमधून बनविले

अमित आवारी

Congress : काँग्रेसतर्फे आझादी गौरव यात्रेची अहमदनगर शहरात सांगता झाली. यात प्रसंगी बोलताना काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते ( Utkarsha Rupwate ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर जोरदार टीका केली. चीनला डोळे दाखविण्याची भाषा करणाऱ्यांनी भारताचे झेंडे चीनमधून बनवून आणले. हे झेंडे सदोष आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आझादी गौरव यात्रेच्या सांगता समारंभाला माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, लहू कानडे, उत्कर्षा रुपवते, करण ससाणे, राजेंद्र नागवडे, माधवराव कानवडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, सचिन गुजर, संगमनेर नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रतापराव शेळके आदी उपस्थित होते.

उत्कर्षा रुपवते म्हणाले की, देशातील काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने गावागावात जाऊन पदयात्रा केली. हा काँग्रेसचा गौरव आहे. आम्हाला अभिमान आहे की, आम्ही काम करत असलेल्या पक्षाची स्थापनाच भारतीय स्वातंत्र्यासाठी झाली. इतिहास बदण्याचे काम देशात सुरू आहे. आमच्या पक्षाच्या झेंड्यातही तिरंगा आहे. त्यांच्या घरावर यापूर्वी कधी तिरंगा होता का? चीनला डोळे दाखविणार होते मात्र हर घर तिरंगा मोहिमेसाठीचे तिरंगे झेंडे हे चीनमध्ये बनविले. विकलेले बहुतेक झेंडे हे चुकीचे आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसतर्फे देशात सर्वत्र आझादी गौरव पदयात्रा घेण्यात आली. भाजपच्या केंद्र सरकारने देशात हर घर तिरंगा हा चांगला उपक्रम हाती घेतला. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या सरकारला आता कुठे तरी तिरंग्याचे महत्त्व व जाण झाली हे पाहून आम्हाला आनंद झाला. काँग्रेसचा जन्मच देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी झाला होता.

हर घर तिरंगा मोहिमेतील नियोजन कुठे तरी चुकीचे झाले असे आमचे मत आहे. बऱ्याच ठिकाणी लोकांना जे झेंडे दिले गेले, विकले गेले. मोफत झेंडे फार कमी लोकांना मिळाले. बऱ्याच जणांना झेंडे विकत घ्यावे लागले. काही ठिकाणी रेशन दुकानांत तिरंगा झेंडा विकत घेत नाही तोपर्यंत रेशनचे धान्य देण्यात आले नाही. काही झेंडे चीनसारख्या देशांमधून आयात करण्यात गेले. आपल्या देशात कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो. आपल्याकडे विनकर मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या देशातील लोकांना ऑर्डर न देता चीन सारख्या देशांत ऑर्डर देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

चीन आपल्या देशात घुसखोरी करतो आहे. ते चीनला लाल डोळे दाखविणार म्हणतात. आणि दुसरीकडे त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचे काम केले जात आहे. काही झेंड्यांवर तिरंग्यातील एखादा रंग जास्त, दुसरा कमी, अशोक चक्र योग्य ठिकाणी नाही. यातून झेंड्याची आचार संहिता मोडल्या गेली. त्याच्या विरोधात आवाज उठविण्याची अवश्यक्ता आहे, असे उत्कर्षा रुपवते यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT