सातारा : पुण्यात तीन मजली उड्डाणपूल बांधत आहोत. सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या खासदार, आमदारांनी एक बैठक बोलवा. आमच्या अधिकाऱ्यांना आराखडा द्या. या भागातील एकही रस्ता महापुरात बुडणार नाही, असा बांधून देतो. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते सोलापूर असा मेट्रो प्रकल्प आपण राबवण्याचा विचार असून ही मेट्रो युरोपियन मेट्रोसारखी असेल. तिचे स्पीड ताशी १४० असेल. त्यामुळे पुणे ते कोल्हापूर केवळ पावणेतीन तासात जाईल. हा प्रकल्प दिशादर्शक असेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
कराड येथे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुमारे सहा हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला कार्यक्रम झाला. यावेळी मंत्री गडकरी बोलत होते. मंत्री गडकरी म्हणाले, सामुहिक विवाह होतो तसा आजचा कार्यक्रम आहे. सर्वच मतदारसंघातील कार्यक्रमांचा एकत्र कार्यक्रम आहे. पालखी मार्ग आळंदी ते पंढरपूर हा बारा हजार कोटींचा होत आहे. श्रीनिवास पाटील यांनी मला निवेदन दिले. त्यामध्ये महापुरात अडकलेल्या रस्त्यांची कामांची यादी होती. खंबाटकी घाटाचे काम महाराष्ट्रात मंत्री असताना करायची संधी मिळाली. लोकांची वाहतूक कोंडीमध्ये अडचण पाहून मी त्यावेळी तातडीने निर्णय घेतला. घाटात बोगदे तयार केले. आता तिथे दुसरा एक बोगदा निर्माण होत आहे. कोल्हापूर ते सांगली रस्त्याचेइ सहा महिन्यात काम सुरू होईल.
पुण्यात तीन मजली उड्डाणपूल बांधत आहोत. सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या खासदार, आमदारांनी एक बैठक बोलवा. आमच्या अधिकारी यांना आराखडा द्या. या भागातील एकही रस्ता महापुरात बुडणार नाही, असा बांधून देतो. पुणे ते बेंगळूर नवा महामार्ग तयार आपण आता करत आहोत. उत्तर भारतातून येणारी वाहतूक मुंबई, सातारा, पुण्याकडे जाते. सुरत, नाशिक, अहमदनगर, तामिळनाडू असा रस्ता करण्याचा प्रकल्प करतो आहोत. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते सोलापूर असा मेट्रो प्रकल्प आपण राबवण्याचा विचार आहे. ही मेट्रो युरोपियन मेट्रोसारखी असेल. तिचे स्पीड ताशी १४० असेल. त्यामुळे पुणे ते कोल्हापूर केवळ पावणेतीन तासात जाईल. हा प्रकल्प दिशादर्शक असेल. खरं तर पहिले प्राधान्य जलमार्ग आहे. महाराष्ट्रात जलमार्गाचा विकास व्हावा असे वाटते.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, शेंद्रे ते कागल हा १४ साली होणे अपेक्षित होते. मात्र त्याला थोडा उशीर झाला. आज या परिसरात या कामांचा शुभारंभ होत आहे. या कामांना सहकार्य करण्याची भुमिका सर्वांनी घ्यायला हवा. रस्ता म्हटले की हल्ली गडकरी साहेबांचे नाव असते. ते जे प्रकल्प सुचवतील त्याला त्या प्रकल्पांना राज्य सरकारचे सहकार्य निश्चित असेल अशी मी ग्वाही देतो.
खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले, मंत्री नितीन गडकरी यांनी गडकरी आहेतच पण ते रोडकरी आहेत. गडकरी यांनी केलेल्या रस्त्यांचे प्रकल्प हे परदेशात असल्यासारखे झाले आहेत.खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, मंत्री गडकरी हे महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार आहेत. ते महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भुमीत आहेत. गतीशिलता, गुणवत्ता आणि गतीमानता हे गुण नितीन गडकरी यांच्यात आहेत. देशात जिकडे जावे तिकडे गडकरींच्या कामाचा ठसा आहे. पुढारी बोलायला उभा राहिला की मागत असतो. मात्र गडकरी हे द्यायलाच बसले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.