Threat to Anna Hazare
Threat to Anna Hazare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Threat to Anna Hazare : 'राळेगणसिद्धीत येऊन अण्णा हजारेंची हत्या करेन'; कुणी दिली धमकी? काय आहे वाद?

Chetan Zadpe

Anna Hajare News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील निपाणी वडगाव संतोष गायधनी या व्यक्तिकडून ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. गायधनी यांचा शेतीच्या जमीनीवर वाद सुरू आहे.

प्रशासन आणि काही लोकांना हाताशी धरून आपल्यावर अन्याय होत असल्याचा, त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणी आण्णा हजारे यांना भेटूनही आपल्याला काही उपयोग होत नाही, यामुळे १ मे रोजी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन त्यांची हत्या करणार आहे, असा इशारा गायधनी यांनी दिला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे गायधनी हे राहतात. काही लोकांनी प्रशासनाशी मिलिभगत करून आपल्यावर अन्याय करत आहेत. गावातील ९६ जणांनी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला नाहक त्रास दिला जात आहे. यामुळे आपले कुटुंबिय धास्तीत आहेत, असे गायधनी यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोलीस, प्रशासन, मंत्री आणि हजारे यांनाही निवेदन दिले आहे, मात्र यावर कोणतीही कार्य़वाही होत नाही, असाही त्यांचा आरोप आहे.

गायधनी यांनी राष्ट्रपतींकडे आत्महत्या करण्याची परवानगी परवानगी मागितली आहे. हे सर्व एकीकडे सुरू असताना, स्वत: हजारेंनी याकडे लक्ष दिले नाही. असा ही आरोप गायधनी यांनी केला आहे. यामुळे आपण आण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचे म्हंटले आहे.

गायधने यांचा हा वाद मागील पाचवर्षांपासून सुरू आहे. गायधने यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेमुळे इतरही शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यातूनच हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर यासंदर्भात विविध तक्रारी दाखल करण्यात आले आहेत. गायधनी यांच्या कडून याआधीही आरोप करण्यात आले होते. काहीवेळा तर परिसरातील काही नेत्यांच्या विरूद्ध तक्रार दाखल झाल्या होत्या. नंतर याविषयी माफी मागून विषय संपवण्यात आला, अशीही अनेक उदाहरणे असल्याचे सांगण्यात येत आहे.

गायधनी यांनी स्थानिक पोलीस अधीक्षक यांना उद्देशून पोस्ट टाकली होती. त्यात त्यांनी आण्णा हजारेंवर विविध आरोप करत, त्यांनी मारण्याची धमकी दिली होती. 'मी एक सामान्य शेतकरी आहे. शेतीच्या वादाच्या कारणावरून माझ्या गटातील ९६ लोकं माझ्या विरोधात जाऊन, माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आत्महत्येची वेळ आणली. तसेच, माझ्यावर खोटी अँट्रोसिटीचीकेस देखील एका दलित महिलेकडून टाकण्याचा कट रचण्यात आला. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन, यासंबंधातील दोषींवर कारवाई केली गेली नाही तर, १ मे २०२३ रोजी आण्णा हजारे यांची हत्या करेल, याची नोंद घ्यावी. असा इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT