Crime news
Crime news Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मंत्री गडाखांच्या पीए वरील हल्ला प्रकरणी तीन जण ताब्यात

सरकारनामा ब्युरो

सोनई ( जि. अहमदनगर ) - जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांचे सोनई परिसरातील काम पाहत असलेले स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी पाच गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (ता. 22) रोजी रात्री लोहगाव (ता. नेवासे) ही घटना घडली. या प्रकरणी जिल्ह्यातील पोलिसांनी वेगवान तपास सुरू केला असून तीन जण ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. ( Three arrested in connection with attack on Minister Gadakh's PA )

राजळे हे सोनई येथील काम अटोपून घोडेगाव मार्गे आपल्या घरी मोटारसायकल वरुन निघाले होते. संशयित तीन ते चार आरोपी दोन मोटारसायकल वरुन त्यांच्या मागावर होते. राजळे लोहगाव येथील आपल्या राहत्या घराजवळ येताच अज्ञात आरोपींनी बेछूट गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्यात राजळे यांना एक गोळी लागली. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेच्या तपासाबाबत माहिती देताना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, राहुल राजळे यांच्यावरील हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तपासासाठी पोलिस पथकेही तयार केली आहेत. तीन जण ताब्यात घेण्यात आले असून यात आणखीही काही लोकांचा सहभाग असल्याचे दिसत आहे. त्या दृष्टीने तपास करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की, आमच्या कामात अडथळा करतो यासाठी हा हल्ला झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. पोलिस तपास करून शाहनिशा निश्चित करतील. मिळालेल्या माहितीनुसार हल्ले करणारे स्थानिक आहेत. तपासात पुढे काय येत आहे त्यानुसार आम्ही कारवाई करू असे मनोज पाटील यांनी सांगितले.

उपचार करत असलेले डॉ. सतीश सोनवणे यांनी सांगितले की, राहुल राजळे यांना काल रात्री 10.40च्या आसपास आमच्याकडे आणण्यात आले होते. त्यांना ऑप्रेशन थेएटरमध्ये घेऊन आम्ही गोळी काढली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT