Solapur Crime News
Solapur Crime News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : मंगळवेढा हादरलं! एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या

हुकूम मुलाणी

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या महिलांची दगड आणि धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ही घटना आज दुपारी घडली असून एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या झाल्यामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ही घटना घडली त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते? नेमकं काय घडलं? या घटनेतील हल्लेखोराने हत्या का केली? अशा अनेक प्रश्नाचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच या प्रकरणी एका संशयीत आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरात दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात इसमाने दिपाली बाळू माळी (वय 25), संगीता महादेव माळी (वय 50), पाराबाई बाबाजी माळी (वय 45) या तीन महिलांची राहत्या घरासमोर धारदार शस्त्राने हत्या केली.

या हत्याकांडादरम्यान अंदाजे चार वर्षे वयाचा रुद्र नावाचा मुलगा भीतीने दरवाजा लावून घरात बसल्यामुळे सुदैवाने तो वाचला. अन्यथा या हत्याकांडाचा तो देखील बळी ठरला असता.

या घटनेने नंदेश्वरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे नंदेश्वर गावात भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत एका संशयितास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT