Dr. Vandana Murkute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

श्रीरामपूर पंचायत समिती सभापतीपदाची गुरुवारी निवडणूक

श्रीरामपूर ( Shrirampur ) येथील पंचायत समितीची मुदत संपेपर्यंत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सभापती संगीता शिंदे यांचे पद अपात्र ठरवले.

गौरव साळुंके

श्रीरामपूर ( अहमदनगर ) : श्रीरामपूर येथील पंचायत समितीची मुदत संपेपर्यंत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सभापती संगीता शिंदे यांचे पद अपात्र ठरवले. असून काँग्रेसच्या गटनेत्या डॉ. वंदना मुरकुटे यांना सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाले आहे. Thursday's election for the post of Shrirampur Panchayat Samiti Chairman

येथील पंचायत समितीच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉ. मुरकुटे, अरुण नाईक, विजय शिंदे व संगीता शिंदे असे चार अधिकृत सदस्य विजयी झाले. पुढे सभापती निवडीच्यावेळी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आठ सदस्यीय असणाऱ्या पंचायत समितीमध्ये डॉ. मुरकुटे व शिंदे या दोन महिला सदस्यांना संधी मिळाली होती.

श्रीरामपूर येथील पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने नुकताच जाहीर केला. असून गुरुवारी (ता. 18) निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सभापती पदावर ओबीसी महिला आरक्षण असल्याने सदर प्रवर्गातील डॉ. वंदना मुरकुटे एकमेव सदस्य असल्याने त्यांची निवड निश्चित होणार असल्याचे मानले जाते.

2017 मध्ये चुरशीच्या झालेल्या येथील पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जाहीर केला आहे. सभापती पदावर ओबीसी महिला आरक्षण असल्याने प्रवर्गातील डॉ. वंदना मुरकुटे एकमेव सदस्य आहेत.

केवळ सोपस्कार म्हणून ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. 2017 मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत दोन महिला सदस्यांना संधी प्राप्त झाली. त्यावेळी निवडीच्या आधी तालुक्यात एक नवे राजकीय समीकरण निर्माण झाले. काँग्रेस पक्षाच्या सभापती पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ. मुरकुटे यांना घोषित केले. असताना ऐनवेळी संगीता शिंदे यांनी विरोधी सदस्यांची मदत घेऊन सभापतीपद मिळवले.

दरम्यान, शिंदे यांच्या विरोधात पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करण्यासाठी डॉ. मुरकुटे यांनी याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सभापती शिंदे यांनी वेळोवेळी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय त्यास आव्हान दिले होते. मात्र दोन्ही ठिकाणी सभापती शिंदे यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सभापती संगीता शिंदे यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अधिनियमानुसार आपात्र घोषित केले. त्यामुळे सदर निवडणुकीसाठी संगिता शिंदे यांच्या व्यतिरीक्त सात सदस्य पात्र राहणार आहे.

दरम्यान, त्यात विखे- मुरकुटे गटाचे चार तर ससाणे गटाचे तीन सदस्य आहे. पंचायत समितीत विखे-मुरकुटे गटाचे सदस्य संख्या अधिक असले तरी सभापतीपद हे ओबीसी महिलेसाठी आरक्षित असल्याने डॉ. मुरकुटे एकमेव ओबीसी महिला सदस्य असल्याने जवळपास त्यांची निवड निश्चित मानली जाते. केवळ सोपस्कार म्हणून ही निवडणूक प्रक्रिया होत आहे.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळमर्यादा सकाळी दहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी दुपारी दोन ते सव्वा दोन वाजता तर उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दुपारी सव्वा दोन वाजता ते दुपारी अडीच वाजेपर्यंत राहणार असून सभापती पदासाठी निवडणूक दुपारी अडीच वाजता होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT