रोहित पवार हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे सख्खे भाऊ अप्पासाहेब पवार यांचे नातू असून राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. त्याचे शिक्षण बारामती, पुणे आणि मुंबई येथे झाले. बारामतीच्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर, पुढे 12 वीपर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं.
त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात बारामतीतून झाली. पुणे जिल्हा परिषदेसाठी ते बारामती तालुक्यातल्या शिरसूफळमधून 2017 मध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर रोहित पवारांनी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.
शालेय जीवनापासूनच त्यांचा व्यवसायाकडे कल होता. बारामती अॅग्रोच्या माध्यमातून त्यांनी व्यवसायास सुरवात केली. परदेशात शिक्षणाची संधी निर्माण झाली असताना, परदेशात न जाता वडिलांना व्यवसायात मदत करण्याच निर्णय रोहित पवार यांनी घेतला आणि वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये (Baramati Agro) पदभार स्वीकारुन व्यवसायात सक्रीय झाले.
रोहित पवारांनी ‘सृजन’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना व्यासपीठ मिळवून दिलं. याच माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजनही ते करत असतात. रोहित यांच्या आई सुनंदा पवार या महिलांसाठी बचतगटांची चळवळ चालवतात. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी पुण्यात भरवली जाणारी भिमथडी जत्रा प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून या भिमथडीच्या जत्रेच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी रोहित स्वतः सांभाळत आहेत.
रोहित यांचं लग्न पुण्यातले प्रसिद्ध बिल्डर सतिश मगर यांची मुलगी कुंती यांच्याशी झालं आहे. त्यांना आनंदिता आणि शिवांश अशी दोन मुलं आहेत.कुंती या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतिश मगर यांच्या कन्या आहेत. नॉटिंगहॅम विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि गुंतवणूक या विषयात त्यांनी पदवी संपादन केली आहे. आज कुंती यांचाही वाढदिवस आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.