Velapur Gram Panchyat Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : वेळापुरात सरपंचपदासाठी तृतीयपंथीयाने ठोकला शड्डू : स्टॅम्प पेपरवरील जाहीरनाम्याने विरोधकांपुढे उभारले आव्हान

सरपंचपदाच्या निवडणुकीत तृतीयपंथी माया अडसूळ यांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

भारत नागणे

पंढरपूर : माळशिरस तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वेळापूर ग्रामपंचायतीच्या‌ (Gram Panchyat) सरपंचपदाच्या (Sarpanch) निवडणुकीत (Election) चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत तृतीयपंथी माया अडसूळ यांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तृतीयपंथी माया अडसूळ यांनी‌ चक्क स्टॅम्प पेपरवर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या या जाहीरनाम्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. (Transgender Maya Adsul filed an application for the post of sarpanch)

माया अडसूळ अल्पशिक्षीत आहे. पण, त्यांना गावाच्या विकासाबद्दल प्रचंड ओढ आहे. गावासाठी नवीन काही तरी करून दाखवायचे आहे. याच जिद्दीने त्यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन सध्या त्या प्रचार करत आहेत. काॅर्नर सभा घेऊन गावाचा काय विकास करणार, याची त्या माहित देत आहेत.

एवढेच नाही तर निवडून आल्यानंतर गावातील लोकांसाठी आपण कोणती विकास कामे करणार‌ यांचा जाहीरनामा शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरच लिहून दिल्याचे ते मतदारांना दाखवत आहेत. तृतीयपंथीच्या स्टॅम्प पेपरवरील या जाहीरनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

जाहीरनाम्यामध्ये गावात १२ ठिकाणी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देणार, गावातील शाळांना सोलरच्या माध्यमातून वीज पुरवठा करणार, महिलांसाठी व‌ मुलींसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष तयार करणार, प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ ऑक्सिजन बेडची सोय करणार, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र सुरू करणार, ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार केंद्र सुरू करणार अशा विविध २० घोषणा लिहून दिल्या आहेत. हाच जाहीरनामा घरोघरो पोचविण्याचे काम माया अडसूळ या करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT