<div class="paragraphs"><p>कर्जतमध्ये एक जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आमदार रोहित पवार समर्थकांनी गुलाल खेळून आनंद साजरा केला.</p></div>

कर्जतमध्ये एक जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आमदार रोहित पवार समर्थकांनी गुलाल खेळून आनंद साजरा केला.

 

सरकारनामा

पश्चिम महाराष्ट्र

भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज माघारी : रोहित पवार समर्थकांनी खेळला गुलाल

नीलेश दिवटे

कर्जत ( अहमदनगर ) : राज्य निवडणूक आयोगाने कर्जत नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम वेळ होती. त्यानुसार कर्जत नगरपंचायत निवडणुकीत 13 जागांसाठी 32 अर्ज शिल्लक राहिले. मात्र, अर्जमाघारीवरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. भाजप उमेदवारानी राष्ट्रावादी काँग्रेसच्या दबावाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा आरोप करत भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी संत गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन केले. Two BJP candidates withdraw their nominations: Rohit Pawar supporters played Gulal

आज दुपारी भाजपचे शहराध्यक्ष वैभव शहा यांच्या पत्नी राखी शहा व भाजपच्या प्रभाग दोन मधील उमेदवार नीता कचरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे प्रभाग दोन मध्ये लंकाबाई खरातच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या राम शिंदे यांनी निवडणूक प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन केले. तर आमदार रोहित पवार समर्थकांनी एक जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल गुलाल खेळून आनंद साजरा केला.

या निवडणुकीत काही प्रभागांत दुरंगी, तर काही प्रभागांत तिरंगी लढती होत आहेत. प्रभाग क्रमांक दोनमध्ये (जोगेश्वरवाडी) लंकाबाई खरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिला. याबाबत अपील झाल्याने तो निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले. भाजपचे शहराध्यक्ष वैभव शहा यांच्या पत्नी माजी नगरसेविका राखी शहा व माजी नगरसेविका नीता कचरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी झाली आहे. शिवसेना एकाही जागेवर लढत नाही. निवडणूक निरीक्षक प्रकाश वायचळ यांनी मतदान बूथपाहणी करीत मार्गदर्शक सूचना केल्या.

प्रभागनिहाय उमेदवार (कंसात पक्ष)-

प्रभाग 2 - लंकाबाई देविदास खरात (राष्ट्रवादी)

प्रभाग 4 - अश्विनी सोमनाथ गायकवाड (भाजप), मनीषा सचिन सोनमाळी (राष्ट्रवादी)आणि आशा बाळासाहेब क्षीरसागर.

प्रभाग 6 - मोनाली ओंकार तोटे (काँग्रेस), गणेश नवनाथ क्षीरसागर (भाजप) आणि दिनेश बाळू थोरात (अपक्ष).

प्रभाग 8 - बबनराव लाढाणे (भाजप) व भाऊसाहेब तोरडमल (काँग्रेस).

प्रभाग 9 - उमेश जपे (भाजप) अमृत काळदाते (राष्ट्रवादी) आणि सोमनाथ भैलुमे.

प्रभाग 10 - मोनिका गदादे (भाजप) आणि उषा राऊत (राष्ट्रवादी),

प्रभाग 11 - मोहिनी पिसाळ (भाजप) आणि ऐश्वर्या नेटके (राष्ट्रवादी).

प्रभाग 12 - शरद म्हेत्रे (भाजप) आणि नामदेव राऊत (राष्ट्रवादी).

प्रभाग 13 - सुवर्णा सुपेकर (राष्ट्रवादी) आणि वनिता शिंदे (भाजप),

प्रभाग 14 - शिबा सय्यद (भाजप) आणि ताराबाई कुलथे (राष्ट्रवादी).

प्रभाग 15 - संजय भैलुमे (भाजप), भास्कर भैलुमे (राष्ट्रवादी), अनिल समुद्र आणि संतोष भैलुमे

प्रभाग 16 - सुवर्णा काकडे (भाजप), प्रतिभा भैलुमे (राष्ट्रवादी) आणि निर्मला भैलुमे.

प्रभाग 17 - अनिल गदादे (भाजप), छाया शेलार (राष्ट्रवादी) आणि धनंजय आगम.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT