Police logo Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

वसुलीवरून वाद भोवला : श्रीरामपूरचे दोन पोलिस कर्मचारी निलंबित

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी रविवारी (ता. 30) निलंबनाचा आदेश काढला आहे.

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : पोलिस ठाण्याच्या हदीदतील वसुलीवरून मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण व्हायरल झाल्याने श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत यांना विभागीय चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी रविवारी (ता. 30) निलंबनाचा आदेश काढला आहे. ( Two police personnel from Shrirampur suspended )

श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांमधील मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाले आहे. पोलिस खात्याची बदनामी करणारे हे संभाषण आहे. पोलिसांची समाजातील प्रतिमा मलिन झाली आहे. हे वर्तन बेशिस्त आणि निष्काळजीपणाचे असल्याचा अहवाल श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या संभाषणाच्या अनुषंगाने शनिवारी (ता. 29) जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठविला होता.

या अहवालानुसार पोलिस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि पोलिस कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 25 आणि मुंबई पोलिस (शिक्षा व अपिल) 1956 चे कलम 3 नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दोघांना निलंबित केले. तसेच पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना नगर येथील पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

या दोघांना पोलिस मुख्यालयात राखीव पोलिस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली रहावे लागणार आहे. दोघांनाही निलंबित कालावधीत खासगी नोकरी किंवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही. दर शुक्रवारी कवायत मैदानावर हजेरी द्यावी लागणार आहे. पोलिस उपअधीक्षक (गृह) यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT