Udayanaraje Bhosle on waghnakh of shivaji maharaj sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : उदयनराजेंची विरोधकांना कळकळीची विनंती, म्हणाले, 'कृपा करून...'

Udayanraje Bhosle on waghnakh of shivaji maharaj : शिवाजी महाराजांच्या वरून अनेकदा वाद विवाद होत असतात. महाराष्ट्र शासनाने समिती नेमावी शिवाजी महाराजांचे चारित्र प्रकाशित करावे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.

Roshan More

Udayanraje Bhosale News : साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचे दर्शन व वाघनखे ठेवण्यात येणाऱ्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर होणारे विविध वाद विवाद थांबवण्याचे आवाहन केले.

उदयनराजे भोसले म्हणाले, दुसरा कोणता विचार देशाला अखंड ठेवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देशाला अखंड ठेवू शकतो. देशात विविध जाती धर्माचे लोक वास्तव करत आहेत. त्यामुळे कुठल्याही पक्षाचे लोक त्यांच्यामध्ये वाद विवाद करत असतील तर त्यांना माझी कळकळीची विनंती त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करू नका. त्यांच्यामध्ये विष कालवू नका. खासकरून शिवाजी महाराजांच्या वस्तू असतील त्याबाबत मतभेद करू नका.

'शिवाजी महाराजांच्या वरून अनेकदा वाद विवाद होत असतात. महाराष्ट्र शासनाने समिती नेमावी शिवाजी महाराजांचे चारित्र प्रकाशित करावे. आपण देव पाहिला नाही मात्र देवाचे सण तारखे प्रमाणे होत असतात. मात्र, शिवाजी महारांजाचा विषय निघतो तेव्हा वाद विवाद का निर्माण केले का जातात?. त्यांची कोणती वस्तु असेल त्याबाबात वाद विवाद निर्माण केले जातात. ', असा प्रश्न उदयराजे भोसले यांनी विचारला.

उदयराजे भोसले Udayanaraje Bhosle यांनी सरकारकडे दिल्लीमध्ये शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी मागणी केली. खासकरून महाराष्ट्र सरकारने यामध्ये पुढाकार घ्यावा, असे देखील उदयनराजे भोसले म्हणाले.

वाघनखं ओरिजनल

शिवाजी महाराजांच्या वाघनखावरून का वाद निर्माण केले जातात. ग्रँड डफ याला प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळी भेट दिली होती. ज्या प्रकारे तलवार एकच नव्हती अनेक होत्या. त्याच प्रमाणे हे वाघनखं त्याचेच प्रतिक आहे. अनेक वाघनखं होती. त्यातीलच हे ओरिजनल आहे. त्याची नोंद इतिहासामध्ये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT