Udayanraje Bhosale News : गुटखा विक्री करणाऱ्यांबरोबरच दहशत माजवणाऱ्यांना पोलिस यंत्रणा पत्र्या कधी ठोकणार, याकडे सर्वसामान्य जनतेच्या नजरा आहेत. तसेच सातारा शहर परिसरात कोयता, तलवारी नाचवणाऱ्यांचा बंदोबस्त करा, अशी सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे पोलिस यंत्रणेला केली आहे.
खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale यांनी पत्रकात म्हटले की, व्यसने आणि व्यसनांधांचे आम्हीच काय कोणीही समर्थन करणार नाही. गुटखा वाईट आहे, तर त्याच्या उत्पादनावरही शासनाने बंदी घातली पाहिजे. शासन नियमातील तफावतीमुळे सर्वसामान्य अडचणीत येत आहेत. पोलिसांचा Police वचक दहशत माजवणाऱ्यांवर असली पाहिजे; परंतु ती गोरगरिबांवर असल्याचे विविध कारवायांमधून स्पष्ट होत आहे.
दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री दहशत पसरवणाऱ्यांचा आणि त्यांच्या सूत्रधारांचा बंदोबस्त प्रथम केला पाहिजे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून, समाजातील कोणालाही कधीही रस्त्याने जाता येता आले पाहिजे, अशा प्रकारची सुरक्षा पुरवली पाहिजे आणि मग छोट्या व्यावसायिकांवर कायद्याने कारवाई करावी, असे मतही त्यांनी पत्रकात मांडले आहे.
अडवून, वाटमारी-जबरी चोरी झाली आहे. रस्त्यावर धारदार शस्त्रे नाचवली गेली आहेत. गोळीबार देखील झाला आहे. अशा अनपेक्षित प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. दहशतखोरांचा बंदोबस्त झाल्यावर, गुटखा किंवा तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याच्या उपक्रमाला अधिक चांगला अर्थ मिळेल, असा विश्वासही उदयनराजेंनी पत्रकात व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.