Udayanraje Bhosale, Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : उदयनराजे म्हणतात की, राष्‍ट्रवादी सोडली, त्‍याचवेळी वाघनख-तलवारी द्यायला पाहिजे होत्‍या...

Umesh Bambare-Patil

Udayanraje Bhosale News : खासदार उदयनराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजपच्या बड्यानेत्यांची भेट घेऊन त्यांना भवानी तलवारीची प्रतिकृती आणि वाघनखं भेट देण्याचा सपाटा लावला आहे. यावर उदयनराजे म्हणतात की, आम्ही राष्‍ट्रवादी सोडली, त्‍याचवेळी इतरांना वाघनख, तलवारी भेट दिल्‍या पाहिजे होत्‍या.

कास तलाव Kaas Dam सुधारित बंदिस्‍त जलवाहिनीच्‍या कामाच्‍या भूमिपूजन कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale बोलत होते. या वेळी त्‍यांच्‍यासमवेत माजी उपाध्‍यक्ष मनोज शेंडे, वसंत लेवे यांच्‍यासह सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्‍थित होते.

राष्‍ट्रवादीतून गेलेल्‍यांना मंत्रिपद मिळाले, तुम्‍ही चार वर्षांपूर्वी राष्‍ट्रवादीतून भाजपत गेला, मात्र तुम्‍हाला अजूनही मंत्रिपद देण्‍यात आले नाही किंवा तसा निरोप देखील आला नाही, या प्रश्‍‍नावर ते म्हणाले, मंत्रिपद मिळावे, असे प्रत्‍येकाला वाटणे स्‍वाभाविक आहे. जिल्ह्याला आणखी लोकप्रतिनिधित्व मिळाले, तर अजून कामे होतील; पण ते कुणाला द्यायचे आणि कुणाला नाही हे माझ्‍या हातात नाही आणि मंत्रिपदासाठी मी का कोणाचे नाव सांगू. उद्या मी म्‍हणेन मला मंत्रिपद द्या; पण मला त्‍यात इंटरेस्ट नाही, अशी टिपणी उदयनराजेंनी यावेळी केली.

राष्‍ट्रवादीच्‍या फुटीनंतर आपण राज्‍यातील प्रमुख नेत्‍यांना भेटत तलवार आणि वाघनख्‍या भेट दिल्‍याबाबत विचारले असता ते म्‍हणाले, ‘‘मी ज्‍यावेळी राष्‍ट्रवादी सोडली, त्‍याचवेळी इतरांना वाघनख्‍या, तलवारी भेट दिल्‍या पाहिजे होत्‍या. तलवारी दिल्‍या म्‍हणजे, तो अधिकार आम्‍हाला नाहीतर दुसऱ्या कोणाला आहे. मला वाटले दिल्‍या. प्रत्‍येकाच्‍या घरात असावी.’’

अजित पवार (Ajit Pawar) यांच्‍या बंडाबाबत विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर ते म्‍हणाले, ‘‘काल आपण देवेंद्र फडणवीस यांची मते ऐकली असतील. त्‍यांनी अत्‍यंत उत्कृष्ट मांडणी केली आहे. त्‍याबाबत त्‍यांचे जे मत आहे तेच माझेही आहे.’’ गेल्‍या काही दिवसांतील भाजपच्‍या नेत्‍यांच्‍या गाठीभेटी आणि मंत्रिमंडळ विस्‍ताराबाबत छेडले असता ते म्‍हणाले, की भेटलो नाही तर तुम्‍हीच म्‍हणणार हे तुटक वागतायत. भेटीत मी त्‍यांना साताऱ्याचे सामाजिक चळवळींतील योगदान सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT