Satara News : भाजप खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या बिनधास्त आणि आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. ते कौतुक वा टीका करताना त्यांच्या हटके स्टाइलने करताना कधीच मागचा पुढचा विचार करत नाही. आता त्यांनी थेट लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवरच जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.
काँग्रेसचे नेते भ्रमिष्ट आणि किऱ्यानिष्ठ राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्या सोशल मीडिया पेजवर केलेल्या आक्षेपार्ह लिखाणामुळे भाजप खासदार उदयनराजे भोसलेंची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. ते म्हणाले, त्यांनी अफू घेऊन असे गलिच्छ लिखाण केले असावे. त्याला या देशात राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. अशी माणसे व त्यांचे समर्थन करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा तसेच या लोकांना वेचून ठेचले पाहिजे, अशी अपेक्षा सातारचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केली आहे.
भाजप खासदार उदयनराजेंनी सातारा येथील त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी गुरुवारी (ता.7) झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधींचा चांगलाच समाचार घेतला.ते म्हणाले, भ्रमिष्ट व किऱ्यानिष्ट राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केला आहे. हा मजकूर वाचून माझ्या मनाला वेदना होत आहेत, असेही राजेंनी यावेळी म्हटलं.
उदयनराजे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना लोक दैवत समजतात. त्याकाळी त्यांनी पुरोगामी सर्वधर्म समभावातून स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्यात लोकांना सहभागी करुन लोकशाहीचा पाय महाराजांनी भरला. त्यांच्याबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आक्षेपार्ह लिखाण करुन स्वतःला कोण समजतो. हा कुठं जन्माला आला आहे, याचे भान त्याला नाही. युगपुरुषांविषयी आदरपूर्वकच बोलले पाहिजे. मात्र, त्याच्याकडून अपमान झालेला आहे. त्याला इतिहासाची किती माहिती आहे, शिवाजी महाराजांविषयी माहिती आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाराजांनी त्या आपल्या देशावरील काळी परकीयांचे आक्रमण परतवून लावले होते. आपल्या देशात त्याकाळी आफू पिकवला जातो, असेही त्याने म्हटले आहे. मुळात त्यानेच अफू घेऊन असे गलिच्छ वक्तव्य केले असून त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही उदयनराजेंनी केली. राहूल गांधी व त्याचे समर्थन करणाऱ्यांनाही जनतेने धडा शिकवला पाहिजे. लोकांनी अशा व्यक्तींना वेचून ठेचले पाहिजे असा घणाघातही भाजप खासदार उदयनराजेंनी यावेळी केलं.
अशी व्यक्ती कोणत्या पक्षाचे नेतृत्व करू शकतो का, असा प्रश्न करुन त्यांना चुकूनही संधी मिळणार नाही पण मिळाली तर देशाचे काय होईल. राहुल गांधी यांनी आपल्या लिखाणातून युग पुरुषांना अप्रत्यक्ष शिव्या दिल्या आहेत. अशा व्यक्तीशी बोलणे ही मी कमीमपणा समजतो. या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज ही देशातील सर्वांचीच अस्मिता आहे. त्यामुळे शिवप्रेमी जनता याविरोधात रस्त्यावर उतरुन निषेध करेल.
खासदार उदयनराजे म्हणाले, राहुल गांधी यांचे पणजोबा पंडीत नेहरु यांनी ही महाराजांना लुटारु म्हटले होते, आता त्यांचा नातू हे असे लिखाण करत असून ते अक्षम्य असून जनता त्याला माफ करणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.