Udayanraje Bhosale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje News : पहलगाम हल्ल्यावर उदयनराजेंचं एक घाव दोन तुकडे; म्हणाले, ...म्हणजे त्यांचा कायमचाच विषय संपेन!

Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानं आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण केला आहे. हा दहशतवादी हल्ला भारतानं खूप गांभीर्यानं घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणालाही सोडणार नाही या घेतलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तानला चांगलाच घाम फुटला आहे.

Deepak Kulkarni

Satara News : पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानं आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण केला आहे. हा दहशतवादी हल्ला भारतानं खूप गांभीर्यानं घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणालाही सोडणार नाही या घेतलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तानला चांगलाच घाम फुटला आहे. मात्र,सर्वच पक्षांनी राजकीय मतभेद विसरुन मोदी सरकारला पाठिंबा देतानाच कडक कारवाईची मागणी केली आहे. आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही पहलगाम हल्ल्यावरुन रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार उदयनराजे भोसले हे नेहमीच त्यांच्या आक्रमक विधानांसाठी ओळखले जातात. आता त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच सल्ला दिला आहे. यावर त्यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारकडे दहशतवादी आणि त्यांचे कॅम्पच उडवले पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे.

उदयनराजे म्हणाले, दहशतवादी आणि त्यांचे ट्रेनिंग कॅम्पच उद्ध्वस्त करून टाका म्हणजे विषयच संपतो.जागतिक परिषदांमध्ये अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित असतात.त्यामध्ये दहशतवादाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे.आता त्यावर तोडगा काढायला हवा, हे असं अजून किती दिवस चालणार? किती लोकांचे बळी जा घेतले जाणार असं त्यांनी म्हटलं आहे.

दहशतवाद्यांना कुणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही.मात्र,असे हल्ले वारंवार होताना दिसून येत आहेत. इतरवेळी प्राण्यांमध्ये सर्वात हुशार माणूस समजला जातो. पण आता प्राणी परवडले असं म्हणण्याची वेळ आली आहे. अशा घटनांमुळे वेदना होतात,गुन्हेगारी थांबवायची असेल तर कठोर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना सुट्टी देता कामा नये, अशा लोकांचा खात्मा झालाच पाहिजे अशी कठोर भूमिका घेण्याचा सल्लाही उदयनराजेंनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारला दिला आहे.

मुख्यमंत्री अब्दुल्लांनी घेतली मोदींची भेट

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. बैठकांचा धडाकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शनिवारी (ता.3) जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा सुरू होती. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेली सुरक्षेसंदर्भाचा आढाव्यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, केंद्राकडून जी कारवाई केली जाईल त्याला जम्मू काश्मीर सरकार साथ देणार आहे. केंद्र सरकारला जम्मू काश्मीर प्रशासन पूर्ण सहकार्य करणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर जम्मू काश्मीर सरकार केंद्र सरकारसोबत असणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT