Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : उदयनराजे दिल्ली दरबारी; अमित शाह देणार का उमेदवारी....

Umesh Bambare-Patil

Satara Loksabha News : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीत जागावाटपाचा वाद सुटत नाही. त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेले खासदार उदयनराजे भोसले हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन याबाबतची मागणी करणार आहेत. अमित शाह सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा सोडवून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना शब्द देणार का, याकडे सबंध सातारकरांचे लक्ष लागले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Loksabha Election Updates) उमेदवार कोण, याची निश्चिती अद्यापपर्यंत झालेली नाही. महायुती व महाविकास आघाडीतील नेते एकमेकांचा उमेदवार कोण असेल, याची वाट पाहत बसले आहेत. तर महायुतीत मात्र राष्ट्रवादी आणि भाजप (BJP) यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit pawar) गटाकडून या मतदारसंघावर दावा सांगितला गेला आहे. त्यांच्याकडून नितीन पाटील हे इच्छुक आहेत, तर कोणत्याही परिस्थितीत उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना तिकीट मिळावे व ते कमळ चिन्हावरच लढतील, अशी भावना उदयनराजे व त्यांच्या समर्थकांत आहे. latest news maharashtra politics

या वादाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उदयनराजे भोसले यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या दोन नेत्यात झालेल्या चर्चेत सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीला केंद्रीय मंत्री अमित शाहांकडे जाण्याचे ठरले. त्यानुसार रात्री उशिरा उदयनराजे भोसले दिल्लीला अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. Current news about Maharashtra politics

आज सकाळी त्यांनी दिल्लीत अमित शाह यांना भेटीची वेळ मागितली आहे. या भेटीत सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अमित शाह सोडवतील, अशी आशा आहे. What is Political Agenda BJP 2024 खासदार उदयनराजेंकडूनही सातारा लोकसभेसाठी मागणी होईल, त्यामुळे अमित शाह उदयनराजेंना उमेदवारी देण्याबाबतचा 'शब्द' देणार का याची उत्सुकता आता ताणली आहे. (Latest Update About Satara Lok Sabha Constituency)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT