Udayanraje Bhosale, Satara News
Udayanraje Bhosale, Satara News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

डॉल्बीच्या तालावर थिरकत उदयनराजेंनी उडवली कॉलर

सरकारनामा ब्यूरो

सातारा : साताऱ्याचे भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आपल्या हटके स्टाईलनमुळे नेहमी चर्चेत असतात. काल रात्री त्यांनी एका कार्यकर्त्याच्या डॉल्बी सिस्टीमचे (लाऊडस्पीकर) उदघाटन करताना उदयनराजेंनी डॉल्बीच्या तालावर थिरकत कॉलर उडवली. या वेळी गणेशोत्सवात डॉल्बी वाजणार असाच सूचक इशारा त्यांनी यातून प्रशासनाला दिला आहे. (Udayanraje Bhosale, Satara News)

सातारा जिल्ह्यात पोलिसांनी डॉल्बीला बंदी असल्याचे सांगितले आहे. मात्र खासदार उदयनराजेही डॉल्बी वाजवावी या मताचे आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी गणेशोत्सवात डॉल्बी वाजविण्याची तयारी केली आहे. एका समर्थकांच्या डॉल्बी सिस्टीमचे उद्घाटन प्रसंगी त्यांनी पुन्हा कॉलर उडवून यावेळी गणेशोत्सवात डॉल्बी वाजणारच असा सूचक इशारा दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्सव काळात डॉल्बीबंदी उठवली पाहिजे,असे सांगत डॉल्बी वाजलीच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.

डॉल्बी सिस्टीम वाजवण्यावर बंदी असल्याने सिस्टीम मालक आर्थिक संकटात सापडले असल्याचे ते म्हणाले होते. सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी लाखो रुपयांची डॉल्बी सिस्टीम विकत घेतली असून याचे उद्घाटन उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदयनराजेंच्या नावाने तयार करण्यात आलेले गाणे डॉल्बी सिस्टीमवर लावण्यात आले होते. उदयनराजेंनी डॉल्बीच्या तालावर थिरकत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फ्लाईंग किस देत हातवारे करत कॉलर उडवून प्रशासनाला एक प्रकारे इशाराच दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT