Udayanraje Bhosale, Sanjay Raut
Udayanraje Bhosale, Sanjay Raut sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale On Sanjay Raut: उदयनराजेंचा राऊतांना टोला; त्यांनी आरशासमोर उभे राहून तेच म्हणावे...

Umesh Bambare-Patil

Karad News : आरसा हा सगळ्यांना लागु होतो. या पृथ्वीवर कोणीही नाही की त्याला तो लागु होत नाही. जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील त्यांनी आरशासमोर तेच म्हणावे, म्हणजे त्यांना त्यांच्या प्रतिबिंबाचे उत्तर आपोआप मिळेल, असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

शिवगर्जना मेळाव्याच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर खोचक शब्दात टीका केली. विधिमंडळ (संसदिय) पक्ष म्हणजे शिवसेना नव्हे, अशा शब्दात शिंदे गटावर निशाणा साधत खासदार राऊत यांनी राज्यात सध्या विधिमंडळ नसून चाळीस जणांचे चोरमंडळ आहे, असा टोला लगावला होता.

विधिमंडळातील पक्ष म्हणजेच शिवसेना असे काही जण म्हणत असतील ते खोटे आहे. ते तर बनावट शिवसैनिक आहेत. विधिमंडळात या बनावट शिवसेना आमदारांच्या रूपाने चाळीस चोरांचे मंडळ आहे. या लोकांनी आपण कितीही शिवसेना असल्याचा आव आणला तर राज्यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही.

त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पद आम्हाला पक्षाने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदे गेली तर परत येतील. पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असेही खासदार राऊत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले हे हजारमाची (ता. कऱ्हाड) येथे आयोजीत बैलगाडी शर्यतीच्या बक्षिस वितरणासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आरसा हा सगळ्यांना लागु होतो. या पृथ्वीवर कोणीही नाही की त्याला लागु होत नाही. जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील त्यांनी आरशासमोर तेच म्हणावे. म्हणजे त्यांना त्यांच्या प्रतिबिंबाचे उत्तर आपोआप मिळेल, असा खोचक टोलाही त्यांनी खासदार राऊत यांचे नाव न घेता लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT