MP Udayanraje Bhosale Latest News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना उदयनराजेंचा इशारा,आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत.. राज्यपालांचाही केला उल्लेख

Udayanraje : ज्यावेळी शिवाजी महाराजांचं विस्मरण होतं त्यावेळेस काय झालं?

सरकारनामा ब्यूरो

सातारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांकडून सातत्याने महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही केल्या जाणाऱ्या वादग्रस्त विधानावर उदयनराजेंनी नाराजी व्यक्त करत इशाराही दिली आहे.

यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही हे सांगत मी हतबल झालो नसून आम्ही काय हातात बांगड्या घातल्या नाहीत, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. (Udayanraje Bhosale Latest News)

उदयनराजे (Udayanraje) म्हणाले, आपण आज काय पाहत आहे.जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्या विचारांवर सर्व जातीधर्मातील लोकं एकत्र आल्याने स्वराज्य मिळालं. स्वराज्य स्थापन झालं म्हणजे आजची लोकशाही. प्रत्येक पक्ष वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेतात,आदर्श मानतात. पण माझ्या मनात एक प्रश्न पडतो की, आजघडीला सर्वधर्म समभावची व्याख्या बदलली आहे का? तसेच ती बदलत चालली का?”, असा सवाल करत उदयनराजेंनी सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, सर्वच जाती-धर्माची लोकं प्रत्येक पक्षात असले पाहिजे. अजेंडा काहीही असो मात्र जोपर्यंत तुमचा अजेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर जात असेल ते चांगलं आहे. मात्र तुम्ही ते आचरणात आणत नाहीत तर मग त्यांच नाव घेण्याचा काय उपयोग आहे? मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेता? आधी पाकिस्तान,बांग्लादेश हे भारतात होते.

महाराज असताना हिंदुस्तान अखंडच होता. ज्यावेळी शिवाजी महाराजांचं विस्मरण होतं त्यावेळेस काय झालं? पाकिस्तान, हिंदुस्तान, बांग्लादेश वेगळं झाले.असेच जर चाललं आणि प्रत्येकजन व्यक्तीकेंद्रीत विशिष्ट समाजाचा विचार करत राहीला तर समाजात तेढ तर निर्माण होईल. या देशाचे त्यावेळेस तीन झाले, आता किती तुकडे होतील? प्रत्येक राज्य आता देश होणार आहेत का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे बोलताना म्हणाले की, आज कुणी काहीही बोलतं. जे असे विधान करत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. वेळप्रसंगी काय करायचं ते आम्ही करूच आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत. राज्यपालांप्रमाणे उद्या कुणीही बोलेणं हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT