Narendra Modi Uddhav Thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahrashtra Politics : मोदींचा करिष्मा कितीही असू द्या, माझ्या मतदारसंघात माझीच जादू; ठाकरेंच्या खासदाराचे थेट चॅलेंज

Omraje Nimbalkar: भाजपनं कितीही मोठी ऑफर दिली तरी...

सरकारनामा ब्यूरो

Omraje Nimbalkar News : लोकसभा निवडणुकीला अद्याप अवकाश असला तरी ठाकरे गटाच्या खासदारानं मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देशात मोदींचा चेहरा मोठा असला तरी उस्मानाबादमध्ये माझा चेहरा छोटा असला तर माझ्या मतदारसंघात अर्थातच उस्मानाबादमध्ये माझीच जादू चालणार असल्याचं दावा केला आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ओमराजे म्हणाले, राज्यात भाजपाचे राष्ट्रीय नेते येऊन जाहीर सभा घेत आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा देशव्यापी चेहरा असला तरी उस्मानाबादमध्ये माझीच जादू चालणार असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर( Omraje Nimbalkar) यांनी म्हटलं आहे. माझा छोटा चेहरा असला तरी मतदार माझा विचार करतील असेही ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी ओमराजे यांनी भाजपला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांची जास्त काळजी वाटत असल्याची टीका देखील केली आहे. तसेच मी माझ्या मतदारसंघात कायमच प्रामाणिकपणे काम केलं असून कोणताही बडेजाव न करता मतदारांसोबत अखंडपणे नातं जपलं आहे. त्यामुळे जनता माझ्याच पाठीमागं कायम उभी राहील. तेरणा कारखाना चालू असताना आमदार राणा पाटील यांनी कर्मचारी संप घडवून आणत तो बंद पाडला. कारखाना सुरु होतो याचा आनंद आहे, त्याला विरोध नाही अशी भूमिकाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मांडली आहे.

भाजपनं कितीही मोठी ऑफर दिली तरी...

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमुळे इथंवर आलो आहे. त्यामुळे ठाकरेंशी प्रतारणा करणार नाही. माझं कर्तव्य आहे, मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे खासदारकीसाठी भाजपनं कितीही ऑफर दिली तरी भाजपात जाणार नाही. तसेच राष्ट्रवादी सोडून जे भाजपात गेले. लोक नेहमी काम पाहून मतदान करतात. त्यांच्यामुळे उस्मानाबाद जिल्हा उपेक्षित राहिला अशा शब्दांत राणा जगजितसिंह पाटलांवर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT