Parner Shivsena
Parner Shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी घातली भावनिक साद : शिवसैनिकांना झाले अश्रू अनावर

मार्तंड बुचुडे

पारनेर ( जि. अहमदनगर ) - पारनेर येथील सेनापती बापट पतसंस्थेच्या सभागृहात आज माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांच्या अध्यक्षतेखाली शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी शिवसैनिकांशी मातोश्रीवरून मोबाईलद्वारे संवाद साधला. त्यांच्या या संवादाने शिवसैनिक भारावून गेले. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली. त्यामुळे अनेक शिवसैनिक भावुक झाले. ( Uddhav Thackeray made an emotional call: Shiv Sainiks shed tears )

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज माझ्या हातात तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. आपल्याला अग्निपथावरून चालायच आहे. पाय सुद्धा भाजतील. त्रासही होईल तसेच तुम्हाला संघर्षही करावा लागेल. धनुष्यबाण आपला होता आपला आहे आपलाच राहणार, तुम्ही सर्वजण तयार असाल तर हो म्हणा. मी लवकरच आपल्या भेटीला येत आहे असे साद त्यांनी शिवसैनिकांना घातली. या वेळी उपस्थितांतील अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

ते पुढे म्हणाले, अगामी काळाच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या शिवसेनेची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे. त्यासाठी तुम्ही एकदिलाने पाठिशी राहाणार असाल तर हो म्हणा असे म्हणाताच उपस्थित सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत होकार देत जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी अचानक झालेल्या या संवादांने सर्व शिवसैनिक आनंदी झाले.

या वेळी उपस्थित शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वांनी आम्ही शिवसैनिक आहोत व कायमच तुमच्या सोबत आहोत काळजी करू नका, असा विश्वास व्यक्त केला. तसेच कुठल्याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकटे पडू न देण्याची शपथ उपस्थित शिवसैनिकांनी घेतली.

विजय औटी म्हणाले, सुखात तर कोणीही बरोबर असते मात्र संकटसमयी व दुःखात बरोबर राहणे गरजेचे असते. त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आहोत व शिवसैनिक म्हणूनच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहणार आहोत, असे सांगितले.

या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समिती माजी सभापती काशिनाथ दाते, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी प्रास्तविक केले. या मेळाव्याला तालुकाप्रमुख विकास रोहोकले, माजी सभापती गणेश शेळके, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, नितीन शेळके, डॉ. भास्कर शिरोळे, शंकर नगरे, निलेश खोडदे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, राजू शेख, पोपट चौधरी, पंढरीनाथ उंडे, संतोष येवले आदी उपस्थितीत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT