मोहोळ मतदारसंघात विकासासाठी पाच वर्षांत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 2700 कोटी रूपयांचा निधी दिला. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ( अजितदादा पवार ) आमदार मोहोळ मतदारसंघातून निवडून येईल, असा विश्वास माजी आमदार, राजन पाटील यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी व्यक्त केला.
मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजितदादा पवार ) जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बाळराजे पाटील यांनी आष्टी उपसा सिंचन योजना, सीना आणि भीमा नदीवर बंधारे त्यासह सीना नदीतून भोगवती नदीत पाणी उचलून टाकणे, अशा काही मागण्या अजितदादा यांच्याकडे केल्या आहेत. या मागण्या अजितदादा पूर्ण करतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
बाळाराजे पाटील म्हणाले, "मोहोळ मतदारसंघ हा उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे. उजनी धरण 100 टक्के भरलं, तरच शेतकरी शेती करतो. दुष्काळ पडला, तर 90 टक्के तालुक्यात टॅकरने पाणीपुरवठा होतो. एवढी बिकट परिस्थिती मतदारसंघाची आहे. 100 टक्के तालुका उजनीवर अवलंबून आहे. उजनी धरण फार मोठे आहे. मात्र, मायमनसमध्ये गेल्यानंतर आम्हाला पाणी मिळत नाही."
"मोहोळ मतदारसंघातून सीना नदी, भीमा नदी, त्यासह उजनीचा कालवा जातो. पण, तालुक्यातील अजूनही काही भाग उजनीतील पाण्याच्या ओलीताखाली आला नाही. आष्टी उपसा सिंचन योजनेची मागणी दोन वर्षांपूर्वी आम्ही अजितदादा अनगरमध्ये आल्यावर केली होती. मात्र, ही योजना विधानसभेचा फॉर्म भरण्याआधी मंजूर झाली पाहिजे. कारण, आम्ही शेतकऱ्यांना आश्वासित केलं आहे," असं बाळराजे यांनी सांगितलं.
"उजनी धरण 100 टक्के भरलं आहे. उजनीतून भीमा आणि सीनेत पाणी सोडलं जातं. आता जवळपास 50 टीएमसी पाणी नदीतून वाहून गेलं आहे. तरी, वाया जाणारे पाणी अडवण्यासाठी सीना आणि भीमा नदीवर बांधले पाहिजेत. जेणेकरून अडवल्यानंतर वाया जाणारे पाणी 12 महिने उपलब्ध होईल. तसेच, सीनेचं पाणी भोगवती नदीत भोगद्याद्वारे आणलं पाहिजे," असंही बाळाराजे पाटील यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.