maratha reservation
maratha reservation sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मराठा आरक्षण परिषदेचा शिंदे-फडणवीस सरकारला अल्टीमेटम ; अन्यथा संघर्ष अटळ

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : राज्यात ओबीसी समाजाला आरक्षण (OBC Reservation) दिल्यानंतरच निवडणुका जशा घेतल्या गेल्या, त्याप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय राज्य सरकारची कोणतीही मेगा नोकर भरती होऊ देणार नाही, असा इशारा सोलापुरातील मराठा आरक्षण परिषदेनंतर शिंदे-फडणवीस सरकारला देण्यात आला.

मराठा समाजातील छुप्या असंतोषाचा कधीही उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे समाजाचा अंत न पाहता ३० दिवसांत आरक्षणाचा निर्णय घ्यावा,असा अल्टिमेटमही देण्यात आला. (Maratha Reservation Latest News)

मराठा आरक्षण परिषदच्या माध्यमातून होणाऱ्या सुप्त क्रांतीची दखल राज्य शासनाने घ्यावी. मराठा समाजाला ५० टक्के आरक्षण हे घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे मराठा समाजातील चळवळीची दखल घेऊन आरक्षण द्यावे. अन्यथा राज्यात पुन्हा एल्गार अटळ आहे, असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे.

जोपर्यंत मराठा समाजाला घटनात्मक ५० टक्के आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात कुठलीही नोकर भरती होऊ देणार नाही, असा इशाराही या परिषदेने राज्य सरकारला दिला आहे.

सकल मराठा, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा आरक्षणासाठी लढा बुलंद करण्यासाठी राज्यव्यापी मराठा आरक्षण परिषद आज छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेच्या पार पडली. यावेळी राज्यातील अनेक मराठा आरक्षण अभ्यासक तज्ञांनी या कार्यक्रमला हजेरी लावली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT