सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Sugar Factory) निवडणुकीत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी एक वाद्ग्रस्त विधान केले. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. ‘अशा लोकांमुळे आम्हाला पाटील म्हणून घ्यायची लाज वाटेल,’ असा हल्लाबोल उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर केला. (Umesh Patil criticizes former MLA Rajan Patil)
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेश पाटील बोलत होते. ते म्हणाले की, आमच्या नेत्याची दोन पोरं प्रचारात आहेत. त्यांनी भाषणात सांगितलं की, आमच्या पोरांना लग्नाच्या अगोदरच पोरं झालेली आहेत. एवढंच नाही तर आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे, असंही ते म्हणाले. लग्नाच्या अगोदर स्वतःच्या पोरांना आधीच पोरं झाली आहेत, असे सांगणारा असंस्कृत, विकृत मनोवृत्तीचा माणूस तुम्हाला भीमा कारखान्याचा नेता म्हणून चालणार आहे का. हा एक प्रकारे महिलांचा सुद्धा अपमान आहे.
त्यांनी पुढं आणखी सांगितलं की लग्नाच्या आधी जी पोरं झाली आहेत, ती तुमच्या वयाची आहेत, असे सांगितले. म्हणजे बापचं पोरांच्या नावाने बिल फाडत होता की काय माहीत. वयाच्या २४ ते २५ व्या वर्षी लग्नं झाली. त्या अगोदरच त्यांच्या पोरांना पोरं झाली आणि ती पोरं आता तुमच्या वयाची झाली आहेत. म्हणजे ते स्वतःची बिलं पोरांच्या नावाने फाडत आहेत. काय नेते...? असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला.
उमेश पाटील म्हणाले की, मोहोळ तालुक्यातील जनतेच्या सहनशिलतेची मलाच कीव येऊ लागली आहे. असला नेता मोहोळ तालुक्याने तीनवेळा निवडून दिला. असला नेता मोहोळ तालुक्याच्या बोकांडी बसला. असला विकृत मनोवृत्तीचा माणूस, घाणेरडा माणूस मोहोळचा असेल तर आम्हाला तालुक्याचा म्हणून घेताना लाज वाटेल. पाटील म्हणून सांगायला लाज वाटेल आणि आडनाव सांगायला लाज वाटेल, असा नेता भीमा कारखान्यात तुम्हाला चालेल का, अशा तिखट शब्दांत उमेश पाटील माजी आमदार राजन पाटलांचा समाचार घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.