Sujit Zaware
Sujit Zaware Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

दुर्दैवाने राजकारणात विकासकामापेक्षा डावपेचाला महत्त्व

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण वाढले आहे. अशातच भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे ( Sujit Zaware ) यांनी विरोधकांवर टीका केली. ( Unfortunately, in politics, tactics are more important than development )

वासुंदे (ता. पारनेर) येथील शिक्री परिसरातील हनुमान मंदिरासमोरील सभामंडपासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला. त्याचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती सोन्याबापू भापकर होते. यावेळी सरपंच सुमन सैद, उपसरपंच शंकर बर्वे, बा. ठ. झावरे, दिलीप पाटोळे, भाऊसाहेब सैद, शरद पाटील, पोपट ठुबे, बाळासाहेब झावरे, बाळासाहेब झावरे, लहानभाऊ झावरे, विलास साठे, बाळासाहेब टोपले, बबन तळेकर, लक्ष्मण झावरे, नारायण झावरे उपस्थित होते.

सुजित झावरे म्हणाले की, राजकारण नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतूही खूप मोठा आहे. दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याच्याकडे पाहत नाही आजच्या राजकारणात विकासकामापेक्षा डावपेचांला अधिक महत्व आले आहे हे दुर्दैव आहे.

झावरे पुढे म्हणाले, की राजकारण फक्त निवडणुकीपुरतं किंवा लढायांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं व त्या विचारांना मूल्यांचा आधार असणं व हेतू असणं आवश्यक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT