mohite patil
mohite patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीची माघार; मोहिते-पाटील गटाचा नगराध्यक्ष होणार बिनविरोध

सरकारनामा ब्यूरो

श्रीपूर (जि. सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीच्या माघारीमुळे मोहिते पाटील समर्थक असलेल्या विकास आघाडीच्या उमेदवार लक्ष्मी अशोक चव्हाण यांच्या बिनविरोध निवडीची केवळ आता औपचारीकता उरली आहे. (Unopposed election of Lakshmi Chavan as council chairman of Sripur-Mahalung Nagar Panchayat)

श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीचे १७ सदस्य असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विकास आघाडीचे नऊ सदस्य निवडून आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहा जागांवर बाजी मारली आहे. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा आदेश दिला होता. मात्र, मोहिते पाटील यांनी मात्र स्थानिक आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी आपली संपूर्ण ताकद भाजपऐवजी रेडे पाटील आणि मुंडफणे गटाच्या पाठीशी उभी केली होती. निकालात ती निर्णायकपणे दिसून आली होती.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विकास आघाडीने लक्ष्मी चव्हाण यांचा, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नामदेव इंगळे यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार इंगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे, त्यामुळे श्रीमती चव्हाण यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्रीपूर-महाळूंग नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया उद्या (ता. १८ फेब्रुवारी) पार पडणार आहे. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. या पदावरसुध्दा विकास आघाडीच्या उमेदवाराची वर्णी लागणार आहे, हे आज स्पष्ट झाले आहे. मोहिते पाटील समर्थक असलेल्या विकास आघाडीचे नेते भीमराव रेडे पाटील व नानासाहेब मुंडफणे यांच्या समन्वयातून उपनराध्यक्षपदाचा उमेदवारही निश्‍चित केला होण्याची शक्यता आहे. विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी रेडे पाटील गटाचा उमेदवार दिला आहे, त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी मुंडफणे गटाला संधी मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT