Sangamner Milk Association
Sangamner Milk Association Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संगमनेर दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजितसिंह देशमुखांची बिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी राजेंद्र चकोर

आनंद गायकवाड

संगमनेर - संगमनेर तालुका दूध उत्पादक संघावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांचे वर्चस्व आहे. या दूध उत्पादक संघातील पदाधिकाऱ्यांची आज निवडणूक झाली. ही निवडणूक बिनविरोध झाली. ( Unopposed election of Ranjit Singh Deshmukh as President of Sangamner Milk Association: Rajendra Chakor as Vice President )

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची फेरनिवड झाली, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र चकोर यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक गणेश पुरी यांनी काम पाहिले.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, इंद्रजित थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ उपस्थित होते. थोरात म्हणाले, संगमनेर तालुका दूध संघाने कठीण परिस्थितीतून वाटचाल करताना नावलौकिक मिळवला आहे. या जोडधंद्यातून ग्रामीण अर्थचक्राला गती दिली आहे. त्यामुळे संगमनेरचा सहकार राज्यात आघाडीवर असून, सर्व सहकारी संस्था चांगल्या पध्दतीने काम करीत आहेत. कोविड काळात एक दिवसही संघ बंद न ठेवता, दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला.

अध्यक्ष देशमुख यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन, दररोज 10 लाख लीटर अतिरिक्त दुधाची पावडर करण्याचा निर्णय घेतला. आगामी काळात दूध व्यवसायात मोठी स्पर्धा आहे. सचोटी व काटकसरीने दूध संघाच्या भरभराटीसाठी काम करणार असल्याचे सांगितले.

यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळ, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, अमित पंडित, संपतराव डोंगरे, नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, गणपतराव सांगळे, सुभाष आहेर, साहेबराव गडाख, भारत मुंगसे, संतोष हासे, जगन्नाथ घुगरकर, डॉ. गंगाधर चव्हाण आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT