Pandharpur News: माळशिरस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उत्तम जानकर (Uttam Jankar)हे इच्छुक आहेत. पण त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राखीव असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून ( Malshiras Assembly Constituency 2024) अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समिती निवडणुक लढविणार असल्याचे सांगत दंड थोपडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम जानकरांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.
माळशिरस येथे अनुसूचित जाती जमातीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा नुकताच झाला. यामध्ये अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समितीच्या वतीने विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. येथे अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांला महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या उत्तम जानकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आले आहेत. मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर यांना महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उत्तम जानकर हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे.
राष्ट्रवादीचे उत्तम जानकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचेकडे अनुसूचित जातीचे सर्टिफिकेट आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उत्तम जानकरांच्या उमेदवारीला विरोध करीत मुळ अनुसूचित जातीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांला उमेदवारी द्यावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली आहे. हक्क संरक्षण कृती समितीने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडी बरोबरच भाजपाला देखील आता माळशिरसमध्ये उमेदवारी देताना विचार करावा लागणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बेधकड बोलणाऱ्या उत्तम जानकर यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी दिली आहे. उत्तम जानकर यांना पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाकरिता विशेष निरीक्षकपदी निुयक्त करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.