Ajit Pawar, Uttam Jankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uttam Jankar On Ajit Pawar : उत्तम जानकरांचा पॅटर्नच वेगळा; पक्षात राहूनच अजित पवारांना इशारा

Madha Politics : एकीकडे मोहिते पाटलांना जिंकून आणण्यासाठी जंग-जंग पछाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर दुसरीकडे आपल्याच पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही धक्का देणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Madha Lok Sabha Constituency : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या सर्व ऑफर बाजूला सारून अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकरांनी Uttam Jankar थेट विरोधकांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. जानकरांनी शरद पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी वेळापूर येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. एकीकडे मोहिते पाटलांना जिंकून आणण्यासाठी जंग-जंग पछाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर दुसरीकडे आपल्याच पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही धक्का देणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे.

आपण अजित पवार गटात असलो तरी काम शरद पवारांसाठी Sharad Pawar करणार असल्याचेच जानकरांनी स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. जानकर म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटील आणि माझे सहा महिन्यांपूर्वीच तिकीट मागायचे ठरले होते. आता सुरू असलेल्या घडामोडींचा निर्णयही त्यावेळीच झाला होता. मी धैर्यशील यांना पाठिंबा देत असलो तरी माझा पक्ष सोडणार नाही. मी माझ्याच पक्षात राहणार आहे. तेथे राहून बारामतीत आमच्या पक्षाध्यक्षांचा पराभव करावा लागणार आहे. तसेच सुप्रिया सुळेंचा विजय झाल्याशिवाय मी काय पक्ष सोडणार नाही. त्यानंतर घड्याळ सोडवून काय तो निर्णय घेऊ, असे जानकरांनी थेट सांगून टाकले.

भाजपकडून राज्यातील प्रत्येकाला भीती दाखवली जाते आहे. त्यानुसार सोडून गेलो तर मलाही तुमचा दाखलाच ठेवणार नाही. न्यायव्यवस्था आमच्या बाजूला आहे. मग तुम्ही कसे आमदार होणार, अशी धमकी दिली. राज्याच्या राजकारणाची अशी संस्कृती नव्हती. त्यामुळे मला भविष्यात काहीही नको, पण राज्याच्या अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी आताची निवडणूक महत्त्वाची आहे. पदे येतील जातील, मात्र न्यायव्यवस्था अशी वागत असेल तर हा जानकर बॉम्ब बनून काम केल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा जानकरांनी भाजपला दिला आहे.

जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर Dhairyashil Mohite Patil गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली. ते म्हणाले, गुन्हा आहे 2020 मधला, मात्र आज निवडणुकीला उभा राहत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मला या सरकारला एकच सांगणे आहे, की तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा. धैर्यशील यांना जेलमध्ये बसू द्या. त्यानंतर मी संपूर्ण सहाही विधानसभा मतदारसंघात फिरून त्यांना तीन लाखांच्या फरकाने निवडून आणणार. तसेच निवडणुकीचा निकाल येईल, त्या दिवशी बेल मिळाला नाहीतर जेल फोडून धैर्यशील यांची जंगी मिरवणूक काढणार, असा इशाराही त्यांनी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT