Vishal Patil On Sangli Politics :
Vishal Patil On Sangli Politics : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil News : वसंतदादांचं स्वप्न सांगलीतील तीन 'व्ही' एकत्र येऊन साकारणार; विशाल पाटलांनी थोपटले दंड!

सरकारनामा ब्यूरो

Sangli News : सांगली शहरात आज काँग्रेस पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सांगलीत काँग्रेसचा महानिर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व काँग्रेसचे बडे नेते सिद्धरामय्या उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजीत कदम, युवा नेते विशाल पाटील (Vishal Patil) उपस्थित होते. यावेळी विशाल पाटील यांनी विविध सांगलीतील स्थानिक राजकारणावर भाष्य करत, काँग्रेसची लाट निर्माण होणार असल्याचे सांगितले. (Latest Marathi News)

याप्रसंगी भाषण करताना विशाल पाटील म्हणाले, "वसंतदादांच्या काळानंतर सांगली आता काँग्रेसचा बोलेकिल्ला राहिला नाही, असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांना या ठिकाणी यावं. मध्यंतरीच्या काळात पक्षात मरगळ आली होती. पण आता काँग्रेसची लाट निर्माण होत आहे. आजचा हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या स्वरूपात घेता येईल का? याबाबत शंका होती. पण आमचे नेते विश्वजीत कदम यांनी आम्हाला पुन्हा एकदा ताकद दिली आणि विश्वास दिला."

सांगलीतील स्थानिक काँग्रेसबाबत बोलताना विशाल पाटील म्हणाले, "मधल्या काही काळात आमच्यातले हेवेदाव्यांमुळे, मीच मोठा नेता अश्या भावनेमुले आम्हीच काँग्रेसचं मोठं नुकसान केलं. हे खरं आहे की, काँग्रेसला काँग्रसच पाडू शकतं, दुसरं कुणाीच पाडू शकत नाही. पण आता आम्हाला पुन्हा पक्षातल्या मोठ्या लोकांनी आमची समजूत काढली आहे. आज या ठिकाणी आपल्याला निर्धार करायचा आहे. आम्ही भाऊ म्हणून एकत्र काम करणार. विश्वजीत कदमांनी नेतृत्व करावं, त्यांच्या पाठिशी वसंतदादा घराण पूर्ण ताकदीनिशी राहणार. कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री सिद्धरमय्याआणि डि के शिवकुमार यांनी जी वज्रमूठ बांधली. त्याचप्रमाणे विश्वजीत कदमांच्या पाठिशी विशाल पाटील पूर्ण ताकदीने उभा राहणार आहे, असे विशाल पाटील म्हणाले.

विशाल पाटील पुढे म्हणाले, "सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रात येण्यासाठी सांगली जिल्हा निवडला. आता काँग्रेसची एक लाट निर्माण होत आहे. सांगलीत भाजपचा खासदार निवडून आल. यांनी सांगलीतल्या जनतेला नुसत्या भूलथापा त्यांनी दिल्या. आज जनता देशोधडीला लागलेली आहे. खासदार मात्र प्रॉपर्टया घेत फिरत आहेत. म्हणून या खासदाराला पाडायची आता वेळ आलेली आहे विश्वजीत कदमांनी जत तालुक्यापासून पलूस कडेगावच्या कोपऱ्यापर्यंत माणसं गोळा करून, आज व्यासपीठ निर्माण करून दिलंय. येणाऱ्या निवडणुकीत याच ताकदीने आपण लढत राहिलो तर निश्चित विजय आपला होणार आहे," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

"सांगलीच्यापाण्याचा प्रश्न विक्रम सावंत यांनी मांडला. यापुढच्या काळातही वसंतदादांनी सुरूवातीला पाहिलेले स्वप्न म्हणजे सांगली जिल्ह्याचं इंच इंच जमीन हे कृष्णा नदीच्या पाण्याने, भिजवून देण्याचं काम पूर्ण करण्याचं काम विश्वजीत कदम, विक्रम सांवंत आणि विशाल पाटील हे तीन व्ही (V) करणार आहेत, एवढं निश्चित सांगतो, असे विशाल पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT