Vasantdada Patil's grand daughter Dr. Madhu Patil passed away due to heart attack
Vasantdada Patil's grand daughter Dr. Madhu Patil passed away due to heart attack 
पश्चिम महाराष्ट्र

वसंतदादा पाटील यांच्या नातीचे डॉ. मधू पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सरकारनामा ब्युरो

सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉ. मधु प्रकाश पाटील (वय ४४) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या त्या बहीण होत्या. शनिवारी (१३ ऑगस्ट) दुपारी एक वाजता पद्माळे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सांगलीतील नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. इतकेच नव्हे तर बोगस डॉक्टर विरोधात त्यांनी सुरू केलेली मोहीमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या त्या पुण्यात आरोग्य उपसंचालक कार्यालयात कार्यरत होत्या. कोरोना महामारी काळातही त्यांनी रुग्णांची सेवा केली. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेक रुग्णांना उपचाराबरोबरच मानसिक रित्याही दिलासा देऊन बरे केले होते.

मधु पाटील यांचे आई-आणि वडील राजकारणात होते. त्यांचे वडील प्रकाशबापू पाटील खासदार आणि आई देखील काँग्रेस पक्षात सक्रीय होत्या. शुक्रवारी रात्री अचानक मधु पाटील यांना अचनाक हृदयविकाराच्या झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

घरातील पहिली मुलगी म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा त्यांच्यावर जीव होता. वसंतदादा प्रेमाने त्यांना चिमुताई म्हणायचे. त्या लहान असताना इंग्लंडमध्ये त्यांच्यावर दोन वेळा हृदय शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतरही तिसऱ्यांदा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतही मोठ्या जिद्दीने त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आणि जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून देऊन काम करत होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT