Vedant Bandgar murder accused hospitalized Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vedant Bandgar case : लेकाच्या खुनातील तो संशयित निष्पाप! वेदांत बंडगरच्या वडिलांनीच पोलिसांकडे दया दाखविण्याची विनंती केल्याने खळबळ

Vedant Bandgar, Sangli news, murder investigation : आता या प्रकरणातील मुख्य तक्रारदारानेच एका संशयितास क्लीनचीट दिल्यासारखा अर्ज केल्यामुळे पोलिस प्रशासन यावर काय भूमिका याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Rahul Gadkar

Sangli murder case : सांगलीतील 14 वर्षांचा वेदांत मारुती बंडगर याच्या खुनातील पोलिसांनी पकडलेला संशयित आरोपी हा निष्पाप असल्याचे त्याच्याच वडिलांचे म्हणणे आहे. तसे पत्रच त्यांनी वेदांत बंडगर याच्या वडिलांनी सांगली पोलिसांना दिल्याने खळबळ उडाली आहे. मारुती बंडगर यांनीच दिलेल्या या पत्रामुळे पोलिसांच्या तपासाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडे लेखी अर्ज मारुती बंडगर यांनी करून त्यांच्यावर दया दाखवण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. ता. ११ जून रोजी वेदांत बंडगर या 14 वर्षीय मुलाचा खून करण्यात आला होता. नीलेश गडदे व त्याच्या साथीदारांनी खून केलाचा आरोप आहे. या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी आतापर्यंत मुख्य संशयितांसह इतर संशयितांना जेरबंद केले आहे.

गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आलेला मोहम्मद जमाल नदाफ हा पूर्णपणे निष्पाप आहे, असा दावा वेदांत यांचे वडील मारुती बंडगर यांनी केला आहे. त्याचा या खुनात कोणताही सहभाग नाही, असे लेखी निवेदन सादर करत संशयित मोहम्मद जमाल नदाफ याच्या सहभागाबाबत मृत वेदांतच्या वडिलांनी आक्षेप घेतला आहे.

पोलिसांना दिलेल्या अर्जात मारुती बंडगर यांनी म्हटले आहे की, मोहम्मद नदाफ हा आमच्या शेजारी अनेक वर्षांपासून राहत आहे. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आमचे त्याच्याशी कोणतेही जुने वैर किंवा भांडण नाही. माझ्या मुलाच्या खुनाच्या घटनेत त्याचा कोणताही संबंध नाही, हे मी खात्रीलायकपणे सांगू शकतो.

मोहम्मद नदाफ हा या घटनेत निर्दोष असल्याचे सांगत, पीडित पित्याने पोलिस प्रशासनाला विनंती केली आहे की, या अर्जाचा आणि आपल्या विधानाचा गांभीर्याने विचार करून त्याची नोंद पोलिस केस डायरीमध्ये घेतली जावी. आता या प्रकरणातील मुख्य तक्रारदारानेच एका संशयितास क्लीनचीट दिल्यासारखा अर्ज केल्यामुळे पोलिस प्रशासन यावर काय भूमिका याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT