Rajesh Kshirsagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajesh Kshirsagar : माजी आमदाराकडून झालेल्या मारहाणीला वेगळे वळण; खासगी सावकारीतून...

Rahul Gadkar

Kolhapur : माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजेंद्र वरपे कुटुंबीयांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. वरपे कुटुंबीय खासगी सावकारीचा व्यवसाय करत आहेत. रा जकीय उद्देशातून क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद होत असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच मारहाणीच्या घटने आधी वरपे कुटुंबीय शिवीगाळ करत होते. त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे सीमा पाटील यांनी सांगितले.

वरपे कुटुंबीयांवर पत्रकार परिषद आयोजित करून आरोप करण्यात आले. राजेंद्र वरपे यांची खासगी सावकारी सुरू आहे. त्यांनी आमचे घर बळकावले आहे. अशा व्यक्तीचा वापर करून राजकारण केले जात आहे, असा आरोप दीपक चंद्रकांत पिराळे आणि कुटुंबीयांनी पत्रकार परिषेदत केला.

पिराळे यांनी सांगितले की, ' आम्ही 18 लाख रुपये स्टेशनरी दुकानासाठी व्याजाने घेतले होते. त्याचे ५३ लाख रुपये परत दिले. तरीही वडणगेतील घर वरपेंनी त्यांच्या मेहुणीच्या नावे करून घेतले. खासगी सावकारीचा परवाना नसतानाही तो व्यवसाय करीत आहे. आम्ही कुटुंबीय आत्महत्या करणार होतो. तेव्हा राजेश क्षीरसागर यांनी पोलिस अधीक्षकांना न्याय देण्यासाठीसांगितले. त्याचाही राग त्यांच्या मनात आहे. म्हणून आम्ही ही माहिती आज देत आहोत.'

दरम्यान, 'आठ डिसेंबरला रात्री टेरेसवरील जेवण झाल्यानंतर भांडी घासताना वरपेंनी महिलांना अश्लील शिवीगाळ केली. तेथे असलेल्या मुलाने त्यांना आवर घातला. तेव्हा त्याला सातव्या मजल्यावरून खाली फेकून देईन, अशी धमकी दिली. याची माहिती राजेश क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतुराज यांना दिल्यानंतर तेथेही मला मारहाण करण्यासाठी वरपेयेत होते. त्यावेळी क्षीरसागर पित्रा- पुत्र आडवे आले. त्यांच्या विरोधात आम्ही पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे, अशी माहिती आचारी सीमा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदारांच्या कुटुंबीयाकडून झालेल्या मारहाणीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते हे देखील आक्रमक झाले. त्यांनी वरपे कुटुंबीयांची भेट घेत ते त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी वरपे कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केली. जर, पोलिसांनी संरक्षण दिले नाही तर आम्ही वरपे कुटुंबीयांना संरक्षण देऊ, असा पवित्रा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतला.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT