Baba Maharaj Satarkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

Umesh Bambare-Patil

Baba Maharaj Satarkar Died : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर ( वय 89) यांचे आज निधन झाले. नवी मुंबईतील नेरुळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी, ता. 27) सायंकाळी पाच वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरम्यान, बाबा महाराज सातारकर Baba maharaj Satarkar यांचे पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरुळ Nerul Mumbai जिमखानासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येईल. बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. Maharashtra News

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यांनंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT