Vijay Shivtare & Uddhav Thackeray Latest News
Vijay Shivtare & Uddhav Thackeray Latest News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या रूपाने देवच भेटलाय : ठाकरेंना `व्हिलन` ठरवत शिवतारेंची स्तुतीसुमने

सरकारनामा ब्यूरो

पुरंदर : पुरंदरमधे आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेस, (NCP) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्याच वेळी एकनाथ शिंदे यांच्या रुपाने देव भेटल्याचा दावाही केला.

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि कॅाग्रेस सोबत युती करून शिवसैनिकांवर आणि शिवसेनेच्या मतदारांवर अन्याय केला. धोका केला आहे. ठाकरे मुख्यमंत्री असतांना त्यांनी सेनेच्या आमदारांना काय दिलं? पुरंदरच्या पिण्याच्या पाण्यासाठी २५ कोटी तुम्ही देऊ शकले नाही. मात्र बारामतीच्या एसटी स्टॅन्डला द्यायला २०० कोटी आपल्याकडे होते, अशा शब्दात विजय शिवतारे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी या मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde), माजी मंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार तानाजी सावंत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.

शिवतारे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी कॅाग्रेस, महाविकास आघाडी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लोबोल केला. ते म्हणाले की ठाकरे यांनी आम्ही ज्या राष्ट्रवादी आणि कॅाग्रेस सोबत २० वर्षे संघर्ष करत मतदारसंघ बांधले. या संघर्षात जे मतदार आमच्या सोबत होते त्यांनी या संघर्षात आपले डोके फोडत संघर्ष करत आमच्यासोबत राहीले त्या मतदारांचा तुम्ही अपमान केला. धोका केला. म्हणून हा प्रकार झाला आहे. मुख्यमंत्री शिंदेच्या रूपान आता देव भेटला आहे. नाहीतर पुढच्या अडीच वर्षात काय झालं असत माहित नव्हतं. महाविकास आघीडी सरकार हे नतद्रष्ट सरकार होतं. यांनी लोकांवर अन्याय केला. परिसरातील शेतकऱ्यांकडून वाढीव सबसिडी घेतली. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार आल्याने पुन्हा शेतकऱ्यांना १९ टक्क्यांनेच पाणी मिळणार आहे. जे त्यांना ३ वर्षात नाही जमलं हे यांनी ३० दिवसात पूर्ण केलं आहे.

शिवतारे म्हणाले, कचरा डेपोमुळे २०१८ साली सगळ पाणी खराब झालं होत. जनावरांनाही पाणी प्यायच्या लायकीच नव्हत असं सरकारने सांगितलं होतं. तेव्हा राज्य सरकारमार्फत १०० कोटींची योजना मंजूर केली.आता जी शंभर कोटींची पाणीपुरवठ्याची योजना आपण पाहून आलो आहे. त्याचे ७५ टक्के ते काम आमदार असतांनाच पूर्ण झाले आहे. तेव्हा उद्धव ठाकरे साहेब आपण मुख्यमंत्री होतात आपल्याला बारामतीच्या एअर पोर्टच्या एसटी स्टॅंन्डला द्यायला २०० कोटी होते. मात्र लोकांच्या प्यायच्या पाण्यासाठी आपण २५ कोटी देऊ शकले नव्हते. तुम्ही शिवसैनिकांवर अन्याय केला. तुम्ही शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय केला. राष्ट्रवादी आणि कॅाग्रेस सोबत आम्ही २० वर्षे संघर्ष करत मतदारसंघ बांधले. डोके फोडत संघर्ष करत आमच्यासोबत राहीलेल्या मतदारांचा तुम्ही अपमान केला. धोका केला. म्हणून हा प्रकार झाला आहे. मात्र, आता शिंदे साहेबांच्या रूपानं देव भेटला आहे. नाहीतर पुढच्या अडीच वर्षात काय झालं असत माहित नव्हतं. महाविकास आघीडी सरकार हे नतद्रष्ट सरकार होतं. यांनी लोकांवर अन्याय केला.

ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना मी पुन्हा सांगतो. माझं पवारांशी काय वाकड होतं. विकासाबद्दल वाकड होत पण मी मंत्री झाल्यावर साडेचार हजार कोटींची कामे आणले होते. पक्षाने आदेश दिला म्हणून मनापासून मी काम केलं होत. म्हणून अजित पवारांनी भर सभेत मला सांगितलं की, तु आता कसा निवडून येतो ते बघतो. मला काही वाटलं नसत मी इतर काही गोष्टीमुळे पडलो असतो तर मात्र, आज जाहीर सांगतो. संजय राऊत, मिर्लेकर, बाळा सामंत यांनी हवेलीत राष्ट्रवादीशी संगनमत केलं आणि घोटाळा केला. माझ्या येथून सुप्रिया सुळे असतांनाही मी १८ हजारांनी पुढे असतो मात्र, राऊतांच्या नालायकपणामुळे माझा पराभव केला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. याच पवारांनी महाराष्ट्रातील सात्वीक राजकारण संपवलं आणि आणि बाजारू राजकारण आणलं. आता शिंदे-फडणवीसांच्या माध्यमातून चांगल्या राजकारणाची ही सुरूवात झाली आहे, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT