Vikhe, Kardile visited the relatives of the victims of the fire accident Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

विखे, कर्डिलेंनी घेतली अग्नी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची भेट

भाजपचे ( BJP ) खासदार सुजय विखे ( MP Dr. Sujay Vikhe Patil ) व माजी मंत्री शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांनी जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगात घटत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागातील अतिदक्षता विभागात 17 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील 11 जणांचा आज मृत्यू झाला. घटनास्थळाला केंद्र व राज्यातील मंत्री, आमदार, खासदार भेटी देत आहेत. त्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचाही समावेश होता. विखे व कर्डिलेंनी घटनास्थळाला भेट देतानाच मृतांच्या कुटूंबीयांची व बचावलेल्या रुग्णांनाही भेट घेतली. मृतांच्या कुटूंबीयांचे सांत्वन केले. Vikhe, Kardile visited the relatives of the victims of the fire accident

भाजपचे खासदार सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, ही घटना दुर्दैवी घटना असून मृत्युमुखी पडणाऱ्या नातेवाईकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळवून देऊ तसेच कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कामचुकार व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार पुढील दिशा ठरवू, ज्या रुग्णांना तातडीच्या उपचारांची गरज आहे अशा रुग्णांना विखे पाटील फाउंडेशन व खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः अग्नितांडवातील रुग्णांची विचारपूस करून तपासणी केली. या प्रसंगी शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT