Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vikhe Patil News : विखे पाटील आमदार नाहीत तर नामदार : सुजय विखेंनी केली चूक दुरुस्त

सरकारनामा ब्युरो

Vikhe Patil News : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 122व्या जयंती निमित्त साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आज मोठ्या थाटात झाला. या कार्यक्रमाला मात्र यंदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांच्या तोंडून सवयी प्रमाणे आमदार शब्द आला मात्र चूक लढात येताच त्यांनी हसत नामदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) असा उल्लेख केला.

विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती सोहळ्यांत मागील 32 वर्षांपासून साहित्य पुरस्कार वितरण होत आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरवात केली होती. ही परंपरा राधाकृष्ण विखे पाटील व राजेंद्र विखे पाटील यांनी जपली आहे. मात्र आज मुंबईत मंत्रीमंडळाची बैठक असल्याने राधाकृष्ण विखे पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक, रावसाहेब कसबे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, राजेंद्र गोंदकर, शिवराज सिंह, काका कोयटे आदी उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त साहित्यिकांना पुरस्कार देण्याची परंपरा बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केली. तेव्हापासून या पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार असा शब्द उच्चारताच त्यांच्या चूक लढात आली. त्यांनी हसत नामदार राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहत आले आहेत. मात्र यंदा मुंबईतील मंत्रीमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित रहावे लागले असल्याने ते या कार्यक्रमास येऊ शकले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, आरिफ मोहम्मद खान हे केवळ राज्यपालच नाहीत तर साहित्यिकही आहेत. त्यांना या कार्यक्रमाला बोलवावे असा आग्रह राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा सन्मान मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृह व सहकार मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या परवा झालेल्या शपथ विधीत प्रथम शपथ घेण्याचा मान दिला. या बद्दल मी विखे परिवारातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मतदार संघासह जिल्ह्यात अनेक वर्षे काम केले. त्यांना जी जबाबदारी देण्यात आली ती ते पारपाडतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राधाकृष्ण विखे पाटील काम करत असताना जिल्ह्यातील सर्व घटकातील लोकांना न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT