Shalini Vikhe-Patil News :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vikhe Patil Political News : लोकसभा- विधानसभेसाठी विखेंची नवी रणनीती ; शालिनी विखे-पाटील ऍक्टिव्ह मोडवर

Shalini Vikhe-Patil News : शालिनी विखे-पाटील गेल्या काही दिवसांत राजकारणात पूर्णवेळ सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Politics : जिल्हा परिषदेच्या सलग दोन टर्म अध्यक्षा राहिलेल्या शालिनीताई विखे गेल्या काही दिवसांत राजकारणात पूर्णवेळ सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा वावर, भाषणे याकडे पाहता नजीकच्या काळातील जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुका पाहता शालिनीताईंबाबत विखे परिवाराकडून काही रणनीती आहे. याबद्दल राजकीय विश्लेषकांत चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच भक्तिपीठ ते शक्तीपीठ तीर्थयात्रेचा समारोप पंढरपूर इथे पार पडला. यावेळी बोलताना, विखे परिवार राजकारण फार कमी आणि समाजकारण कायम करत आला अशी भूमिका मांडली.

राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी आणि खा.सुजय विखे यांच्या मातोश्री असलेल्या शालिनीताई विखे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. शालिनी विखे म्हणाल्या, विखे पाटील परिवार हा राजकारण फार कमी आणि समाजकारण हे कायम करत आले आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेत असताना या तीर्थ यात्रेच्या निमित्ताने पन्नास हजार माताभगिनींना पंढरपूर, तुळजापूर या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवले हे याचच एक उदाहरण आहे.

मतदार संघ म्हणजे आमचा परिवार आहे. या परिवाराच्या सुखदुःखात आम्ही कायम सहभागी असतोत. या महिलांनी या तीर्थ यात्रेसाठी येवून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करून खा.डॉ.सुजय विखे यांनी अत्यंत छान काम केल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे यावेळी त्यांनी कौतुक केले. समारोप कार्यक्रमास खा.सुजय विखे, इस्कॉन मठाचे श्रीकृष्ण चैत्यन्य महाराज स्वामी, श्री प्रल्हाद प्रभुजी,अच्युत प्रभुजी आदी उपस्थित होते.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT